शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान नगर परिषदेचे १० नगरसेवक अपात्र, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 10:47 IST

Matheran Municipal Council : माथेरानमधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एक स्वीकृत असे १० नगरसेवक यांनी २७ मे, २०२१ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

- विजय मांडे 

कर्जत :  माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या १० नगरसेवकांना शुक्रवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्याचा निर्णय मंजूर केला. माथेरानमधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एक स्वीकृत असे १० नगरसेवक यांनी २७ मे, २०२१ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

२०१६ मध्ये निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर रूपाली आखाडे, प्रियांका कदम, ज्योती सोनावले, संदीप कदम, प्रतिभा घावरे, आकाश चौधरी, सुषमा जाधव, राकेश चौधरी, सोनम दाभेकर आणि स्वीकृत सदस्य चंद्रकांत जाधव अशा १० सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेचे मुख्य सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात या नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या त्या अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात ३० जून, २०२१ रोजी सुनावणी झाली. पुढील सुनावणी ५ जुलै रोजी घेण्यात आली. त्यावेळी गटनेते प्रसाद सावंत यांनी  सर्व नगरसेवकांविरोधात वेगवेगळे १० रिट पिटिशन दाखल केले होते.

शिवसेना पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या १० सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरविण्याची मागणी आम्ही केली होती. पक्षाच्या दृष्टीने असा प्रकार पक्षाच्या शिस्तीत बसणारा नाही, हे दाखवून दिले होते, तर शिवसेना सचिव आदेश बांदेकर, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर हेही आमच्या पाठीशी ठामपणे उभे होते. - प्रसाद सावंत, याचिकाकर्ते

आम्ही रायगड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात राज्याचे नगरविकासमंत्री यांच्याकडे दाद मागणार आहोत. त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही, तर आम्ही मात्र मुंबई उच्च न्यायालयात रायगड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला आव्हान देणार.- प्रवीण सकपाळ, अध्यक्ष, माथेरान, भाजप

पालिकेतील अनागोंदी कारभार मान्य नव्हता, म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. आता आम्हाला अपात्र केले आहे. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.- आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष 

टॅग्स :Matheranमाथेरान