शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 852 गणेशमुर्तींची होणार प्रतिष्ठापना, बाजारात अजुनही गर्दी

By निखिल म्हात्रे | Updated: September 18, 2023 15:17 IST

काेकणसह मुंबईत गणेशाेत्सव अतिशय जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यामध्ये तब्बल 1 लाख 2 हजार 852 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये 271 सार्वजनिक तर, 1 लाख 2 हजार 581 खासगी गणेश मुर्तींचा समावेश आहे. गणरायाच्या आगमनानंतर चाैथ्या दिवशी 14 हजार 455 गाैरींचा मुक्कामही गणेश भक्तांच्या घरी राहणार आहे. बाप्पाच्या तयारीसाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारामध्ये चांगलीच गर्दी अनुभवाला मिळाली.

काेकणामध्ये गणेशाेत्सव अतिशय जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे. आगरी, काेळी, माळी, ब्राह्मण, मराठा अशा विविध समाजातील गणेश भक्त गणेशाेत्सव हा सण म्हणून माेठ्या उत्साहाने साजरा करतात. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाचे आगमन हाेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले हाेते. मंगळवारी भक्तांची उत्कंठा बाप्पाच्या आगमनाने संपणार आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस ताे गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन हाेणार आहे.

पाैराहित्य करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने गेल्या काही वर्षापासून गणारायाच्या प्रतिष्ठापनेच्या पुजेसाठी कमतरता जाणवते. याकालावधी त्यांना प्रचंड मागणी असल्याने पाैराहित्य करणारऱ्यांना सर्वांच्याच वेळा पाळणे शक्य हाेत नाही. यावर उपाय म्हणून सिडी अथाव पुस्तकांमध्ये वाचून पुजा सांगण्याचा ट्रेंड पहायला मिळत आहे. पाैराहित्य करणाऱ्याची वाट बघत बाप्पाच्या मुर्तीला तात्कळत ठेवणे याेग्य वाटत नसल्याचे काही गणेश भक्त सांगतात. त्यामुळे असा पर्याय निवडावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यामध्ये तब्बल 1 लाख 2 हजार 852 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामध्ये 271 सार्वजनिक तर, 1 लाख 2 हजार 581 खासगी मुर्तींचा समावेश आहे. दीड दिवसांचे 10 सार्वजनिक तर 25 हजार 614 खाजगी गणरायाच्या मुर्ती आहेत. पाच दिवसांच्या 72 सार्वजनिक आणि 58 हजार 666 खासगी, सात दिवसांचे 14 सार्वजनिक तर, 211 खासगी मुर्तींचा समावेश आहे. दहा दिवसांचे तब्बल 151 सार्वजनिक आणि 17 हजार 393 खासगी गणेशमुर्तींचे जिल्ह्यात आगमन हाेणार आहे. तसेच तीन हजार गाैरीचे आगमन चाैथ्या दिवशी हाेणार आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवRaigadरायगड