शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

जिल्हा परिषदेच्या शाळाही टेक्नोसॅव्ही!

By admin | Updated: April 17, 2015 23:30 IST

ग्रामीण भागातील शाळा व शिक्षक टेक्नोसॅव्ही बनत असल्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी सांगितले.

पुणे : एबीएल कार्ड, संगणक, इ लर्निंग आणि इंटरनेटर याचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना रंजकपणे शिकवत असून ग्रामीण भागातील शाळा व शिक्षक टेक्नोसॅव्ही बनत असल्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता मोबईलमुळे ‘सोशल’ होत आहेत. याचा विचार करून त्यांचे शिक्षणही रंजक व्हावे म्हणून शिक्षणासाठी सोशल मीडियाचा वापर होणार आहे. यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत बुधवारी एक कार्यशाळा घेण्यात आली असून, याचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नंद कुमार बोलत होते. जिल्हा परिषदेत ही कार्याशाळा झाली. या वेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हारून आतार, शिक्षणाधिकारी (निरंतर) वैशाली जामदार आदी मान्यवर उपस्थित होते. दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अध्यापनात रंजकता आणणे, विद्यार्थ्यांचा वर्गातील प्रत्येक कृतीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त करणे, सहज व सुलभ अध्ययनास चालना देणे, याविषयी मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.सोशल मीडियाचा शिक्षणात प्रभावी वापर व्हावा, परंतु त्याचा शैक्षणिक कारणांसाठीच वापर केला जावा अशा सूचना शिक्षण संचालक महावीर माने यांनी या वेळी दिल्या.जिल्ह्यातील शाळा आयएसओ मानांकनात सर्वाधिक आहेत. शाळांचे कामकाज उत्तम सुरू आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल होत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)इंग्रजीची भीती कमी व्हावी, गणितासारखा विषय सोप्या पद्धतीने शिकविता यावा, विद्यार्थ्यांना जगाची अद्ययावत माहिती व्हावी यासाठी सोशल मीडियाचा चांगल्याप्रकारे वापर शिक्षकांनी वापर करावा.- नंद कुमार, प्रधान सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग