शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षकांचे ज्ञानसंवर्धन!

By admin | Updated: May 7, 2016 05:08 IST

लोकसहभागामुळे शाळांचा कायापालट होत असून काही शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेतही खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आहेत. विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद

पुणे : लोकसहभागामुळे शाळांचा कायापालट होत असून काही शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेतही खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आहेत. विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आपले शिक्षकही अपडेट असावेत, यासाठी टीइटीच्या धर्तीवर ज्ञानसंवर्धन परीक्षा घेण्याचा विचार करीत आहे. शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या मासिक आढावा बैैठकीत यावर सदस्यांची मते जाणून घेतली असून शिक्षक संघटना, शिक्षक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. सध्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारत आहे. ७४० शाळा आयएसओ झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत. विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत. मात्र त्यांना शिक्षणही त्याच दर्जाचे मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे विविध उपक्रम, कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहावे, बौद्धिक व मानसिक विकास व्हावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत सुधारणा व्हावी, बदलत्या शैक्षणिक प्रवाहांची शिक्षकाला ओळख व्हावी, यासाठी ही ज्ञानसंवर्धन परीक्षा घेण्याचा विचार आहे. पहिली ते आठवीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकास नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे कार्यरत शिक्षकांसाठीही अशी परीक्षा व्हावी, यावर समितीच्या बैैठकीत सर्व सदस्यांचे एकमत झाले. या परीक्षेमुळे कोणावरही कारवाई अथवा त्याच्या वेतन, बढतीवर परिणाम होणार नाही, असेही वांजळे यांनी स्पष्ट केले.सध्या विविध क्षेत्रांत कर्मचारी अपग्रेड ठेवण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित असते. पुढील काळात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ही जबाबदारीही राहणार आहे. त्यामुळे आमचे शिक्षकही काळाबरोबर बदलत राहावे, हा एकच हेतू यामागे आहे.- शुक्राचार्य वांजळे, सभापती, शिक्षण समितीही परीक्षा देणे ही सक्ती नसावी. यामुळे कोणावरही कारवाई होऊ नये. फक्त शिक्षक अपगे्रड राहण्यासाठी घेतल्यास हरकत नाही.- खंडेराव ढोबळे, सरचिटणीस, शिक्षक संघ