शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: March 19, 2017 03:56 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद आपल्याला मिळावे, यासाठी उमेदवारांनी जोरदार

पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद आपल्याला मिळावे, यासाठी उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर, आपल्या तालुक्यात व आपल्या समर्थकांना ही पदे मिळावीत, यासाठी तालुक्यातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७५ जागांपैकी ४४ जागा मिळून राष्ट्रवादी काँगे्रसने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी, विविध समित्यांच्या ४ सभापतिपदी राष्ट्रवादी काँगे्रसचेच सदस्य निवडून येणार, हे निश्चित आहे. यामध्ये येत्या मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर सभापती पदांसाठी निवडणूक होईल. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना ज्या तालुक्यात पक्षाचे सर्वांधिक उमेदवार निवडून येतील, त्यांनाच अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदे देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. पवार यांच्या या निकषानुसार अध्यक्षपदावर खऱ्या अर्थांने बारामती तालुक्याचा दावा असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी (ओबीसी) आरक्षित आहे. अध्यक्षपदाची माळ यंदा जुन्नर अथवा बारामती तालुक्याच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांचे समर्थक जुन्नर तालुक्यातील राजुरी-बेल्हा गटातून निवडून आलेले पांडुरंग पवार यांचे नाव आघाडीवर आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच वळसे-पाटील यांनी अध्यक्षपदासाठी पवार यांच्या नावाची घोषणा केली होती. पवार यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले असून, उपाध्यक्ष म्हणून कामदेखील केले आहे. परंतु, गटनेतेपद जुन्नर तालुक्यातच शरद लेंडे यांना दिल्याने पुन्हा अध्यक्षपद मिळणार का, हा प्रश्नच आहे. त्यानंतर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर-मोरगाव गटातून निवडून आलेले विश्वास देवकाते यांच्या नावाचीदेखील अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. परंतु, देवकाते यांच्या उमेदवारीपासूनच तालुक्यात त्यांना विरोध झाला. तालुक्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश खोमणे यांच्यासह अनेकांचा देवकाते यांना अध्यक्षपद देण्यास विरोध होऊ शकतो. दरम्यान, पवार घराण्यातील रोहित पवार यांना अध्यक्षपद द्यावे, अशी तालुक्यातील सर्व सदस्यांची मागणी आहे. परंतु, घराणेशाहीचे आरोप होत असताना पवार यांना अध्यक्षपद देणार का, याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यातील वैशाली पाटील यांच्या नावाचीदेखील अध्यक्षपदासाठी चर्चा आहे; परंतु आमदार दत्तात्रय भरणे याबाबत काय भूमिका घेतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. दौंड तालुक्यातील दुसऱ्यांदा निवडून आलेल्या राणी शेळके उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. याशिवाय, आंबेगाव तालुक्यातील दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील यांनादेखील उपाध्यक्ष अथवा एखादे सभापती पद दिली जाण्याची शक्यता आहे.-  शिरूर तालुक्यातील माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार व सुनीता गावडे यांना एखादे पद मिळू शकते. तर, अनुभवी सदस्य म्हणून इंदापूर तालुक्यातील वीरधवल जगदाळे, भोर तालुक्यातील रणजित शिवतरे यांच्या नावाचादेखील विचार होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद मिळण्यासाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, पक्षाचे नेते अजित पवार नव्याने निवडून आलेल्या एखाद्या नवख्या सदस्यालादेखील पद देऊ शकतात.