शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्ष लागले कामाला

By admin | Updated: January 10, 2017 02:51 IST

महापालिका पाठोपाठ सर्व राजकीय पक्ष आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेणे

पुणे: महापालिका पाठोपाठ सर्व राजकीय पक्ष आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, आरक्षित जागांवर उमेदवारांचा शोध घेणे, मतदार संघनिहाय उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची धावपळ सुरु आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी निवडीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीची रणधुमाळी आता लवकरच सुरू होणार आहे. सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे. जिल्हात काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसकडून उमेदवारांच्या मुलाखतीचे फड मंगळवार (दि.१०) पासून सुरु होत आहेत. यामध्ये सध्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने ७५ जिल्हा परिषद गट व १५० पंचायत समिती गणांसाठी १० व ११ जानेवारी दरम्यान पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात तालुकानिहाय मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. काँगे्रसच्या वतीने प्रत्येक गट व गणनिहाय उमेदवारी अर्ज मागविले असून, उमेदवारांच्या मुलाखती तालुकास्तरावरच घेण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला मावळ व शिरुर तालुका सोडल्यास अन्य सर्व तालुक्यांमध्ये उमेदवारांचा शोध घ्यावा लागत असून, इतर पक्षातील कोणी तगडा उमेदवार गळाला लागतोय का या शोधात सध्या भाजप आहे. जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये भाजपला उमेदवार मिळतील का याबाबत देखील शंका आहे. शिवसेनेकडून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत.राष्ट्रवादी यादी लवकरच जाहीर करणारजिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने मंगळावर (दि.१०) पासून सकाळी ९ वाजल्या पासून मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात सुरुवात होणार आहे. यामध्ये पक्षाचे नेते अजित पवार, दिलपी वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपक यांच्यासह आजी-माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. पहिल्या दिवशी हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती तर बुधवार (दि.११) रोजी हवेली, जुन्नर, मावळ, शिरुर, आंबेगाव, खेड आणि मुळशी तालुक्यातील उमेदवारांच्या मुलखती घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसकडे सर्व जागांवर तुल्यबळ उमेदवार असून, जिल्ह्यात सर्वांत पहिले उमेदवाराची यादी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात येईल.- जालिंदर कामठे, राष्ट्रवादी काँगे्रस जिल्हाध्यक्षकाँगे्रस सर्व जागा लढविणारजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने तयारी सुरु केली असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती तालुकास्तरावरच पक्षाचे नेते व पदाधिका-यांच्या उपस्थित घेण्यात येणार आहे. यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा सर्व शक्तीने लढविण्यात येणार आहेत.- संजय जगताप, काँगे्रस जिल्हाध्यक्ष