शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झिरो बॅलन्स खाते उघडणे जिकिरीचे

By admin | Updated: May 13, 2017 04:31 IST

जिल्ह्यातील सामजिक व आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाची रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील सामजिक व आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाची रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सध्या बॅँकेत विद्यार्थ्यांची खाती उघडण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र बँका झिरो बॅलन्स खाते उघडून देण्यास नकार देत असल्याने चारशेच्या गणवेशासाठी आधीच आर्थिक मागास असलेल्या पालकांना पाचशेचा भुर्दंड पडत आहे. त्यात ४०० रुपयांत दोन गणवेश येत नसल्याने पालकांसमोर मोठी अडचण झाली असून, या योजनेतून आम्हाला फायदा होण्याऐवजी तोटाच होत असल्याची भावना जिल्ह्यातील अनेक पालकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित बॅँकेबरोबर चर्चा करून झिरो बॅलन्स खाती उघडण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.थेट लाभ हस्तांतर सहकार्य हवेशासनाने विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) योजनेद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते उघडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र काही राष्ट्रीयीकृत बँका विद्यार्थ्यांसाठी शून्य शिलकीत खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना विहित वेळेत गणवेशाच्या रकमा त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी अडथळा निर्माण होऊन गणवेश मिळण्यास विलंब होऊ शकतो. तेव्हा विद्यार्थ्यांच्या सोई-सुविधा मिळण्यासाठी आणि शासनाचे चांगले धोरण राबविण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. - गोरक्षनाथ हिंगणे, शिक्षण विस्तार अधिकारी, दौंडअनामत रक्कम कशासाठी?काही राष्ट्रीयीकृत बँका ‘झिरो बॅलन्स’वर खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांना २०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशांसाठी ४०० रुपये शासनाकडून मिळतात; परंतु प्रत्यक्षात एक गणवेश खरेदी करण्यासाठीच ४०० रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च होतात. शिवाय यावर्षी विद्यार्थ्यांचे बँकांत खाते उघडण्यासाठी ग्रामीण भागातील बँका २ हजार रुपयांची अनामत रक्कम मागत आहेत, असे असेल तर ४०० रुपयांसाठी दोन हजार रुपयांची अनामत रक्कम कशासाठी बँकेत जमा करावयाची? असा प्रश्न सध्या पालकांसमोर उभा आहे.- अरुण भोई, पालक, राजेगावगणवेश घेणे म्हणजे मनस्ताप करून घेण्यासारखे शासनाकडून प्राथमिक शाळेतील मुलांना गणवेश घेण्यासाठी देण्यात येणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. या पैशातून दोन गणवेश येत नाहीत. त्यामुळे गणवेश घेणे परवडत नाही. शिवाय बॅँकेत खाते उघडण्यास वेगळे पैसे लागतात. त्यामुळे मुलांना गणवेश घेणे म्हणजे मनस्ताप करून घेण्यासारखे असून पूर्वीचीच पद्धत योग्य होती.- अमित शिवतरे, उत्रौली, भोरपालकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड शासनाच्या वतीने प्राथमिक शाळेतील गणवेश खरेदीसाठी एका गणवेशाला २०० रुपयांप्रमाणे ४०० रुपये दिले जातात. मात्र एक गणवेश घेण्यास साधारणपणे ४०० ते ४५० रुपये लागतात. त्यामुळे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पैशात गणवेश खरेदी करणे शक्य होत नसल्याने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांना विनाकारण पैशाचा भुर्दंड बसत आहे. - पांडुरंग गोरे, हिर्डोशी, भोरपूर्वीची गणवेश खरेदीप्रक्रिया अमलात आणावी...गणवेश खरेदीबाबत नवीन निर्णयामुळे पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन गणवेश खरेदी करण्याची प्रक्रिया किचकट आहे. नवीन निर्णयानुसार गणवेश खरेदी करण्याची पावती प्रथम दाखवावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला गणवेशाच्या रक मेचा धनादेश मिळणार आहे. - किशोर भोईटे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सणसरविद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय योग्यच...-गणवेश खरेदीसाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय योग्यच आहे. पालकांच्या हातात पैसे मिळाल्यावर अधिक चांगल्या दर्जाचा गणवेश खरेदी करणे शक्य होईल. चांगल्या दर्जाचे, निवडक गणवेश खरेदी विद्यार्थ्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या फायद्याचाच आहे. मात्र, हे पैसे देताना पालकांना नाहक त्रास सहन करावा लागू नये. रांगेत थांबण्याची वेळ पालकांवर येऊ नये.- रचना शेलार, पालक, सणसर