शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘झीरो पेंडन्सी’ लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:13 IST

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी झीरो

पुणे : राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी झीरो पेंडन्सी या पद्धतीचा अवलंब केला जाणार असून, येत्या १८ एप्रिलपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. नागरिकांची प्रशासकीय कामे तत्परतेने व्हावीत, या उद्देशाने या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सरकारी काम म्हटले, की विलंब असे समीकरण झाले आहे. मात्र, त्यावर उपाय म्हणून प्रशासकीय कामकाजात ‘झीरो पेंडन्सी’चा अवलंब केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतया कार्यपद्धतीबाबत चांगलीच जागृती झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळण्यासाठी सध्या सर्व थकीत प्रकणांचा निपटारा केला जात आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ फेब्रुवारी २०१८ रोजी झीरो पेंडन्सीचा अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘झीरो पेंडन्सी’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी सुरू करणे बंधनकारक आहे.पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘‘राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात ‘झीरो पेंडन्सी’ राबविण्याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत कार्यालयांमधील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. येत्या १८ एप्रिलपासून अध्यादेशाप्रमाणे कार्यपद्धतीला सुरुवात केली जाईल. कार्यालयालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवारिक्त असलेली सर्व पदे भरलीतरीही या कार्यपद्धतीनुसार काम सुरू करता येईल.