शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून

By admin | Updated: June 10, 2015 04:58 IST

नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे तीन तरुणांनी एकाचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री सहकारनगर येथे उघडकीस आली.

पुणे : नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे तीन तरुणांनी एकाचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री सहकारनगर येथे उघडकीस आली. खून केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.संजय मुरलीधर बागल (वय ३५, रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हन्या ऊर्फ हनुमंत नागनाथ परभले (वय २५, रा. शिवकॉलनी, सूर्या चौक, आंबेगाव पठार), सुनील नारायण निर्मल (वय २८, रा. सावरकर चौक, धनकवडी), सूरज तुकाराम कारले (वय २६, रा. सावरकर चौक, धनकवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परभले आणि निर्मल हे मावसभाऊ आहेत. तर, कारले हा त्यांच्याजवळ राहण्यास असून, मानलेला भाऊ आहे. निर्मल याच्या नात्यातील महिलेशी बागल याचे प्रेमसंबंध होते. संबंधित महिलेचेही लग्न झालेले असून तिला १२ वर्षांचा मुलगा आहे. ओळखीच्या असलेल्या बागलला तिघांनीही काही दिवसांपूर्वी समजावून सांगून हे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. परंतु, बागल आणि संबंधित महिलेचे प्रेमसंबंध सुरूच राहिल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्याला रविवारी रात्री दारू प्यायला सोबत नेले. (प्रतिनिधी)