शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचा ओढा पाश्चात्त्य नृत्याकडे

By admin | Updated: April 29, 2015 01:21 IST

वाढत्या रिअ‍ॅलिटी शो व रिमिक्स गाण्यांमुळे तरूणांना हिप-पॉप, सालसा, लॅटिनो, जाज, पास्ता डोबळे, कंटेम्परी, बॉलिवुड अशा पाश्चात्य नृत्याकडे आजच्या पिढीतील तरुणांचा ओढा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

बेनझीर जमादार ल्ल पुणेवाढत्या रिअ‍ॅलिटी शो व रिमिक्स गाण्यांमुळे तरूणांना हिप-पॉप, सालसा, लॅटिनो, जाज, पास्ता डोबळे, कंटेम्परी, बॉलिवुड अशा पाश्चात्य नृत्याकडे आजच्या पिढीतील तरुणांचा ओढा जास्त असल्याचे दिसून आले आहे. पालकांचादेखील नृत्य या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो. झटपट प्रसिद्धी, पैसा व ग्लॅमर या गोष्टीमुळे पालकांबरोबर मुलेदेखील रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतात. वाढत्या स्पर्धेमुळे आपल्या मुलाने अभ्यासाबरोबर क्रीडा किवा अभिनय, नृत्य क्षेत्रात नाव कमवावे अशी पालकांची इच्छा असते.रिमिक्स गाण्यांमुळे तरुणांना क्लासिकल गाणी ऐकण्यात रस नसतो. त्यामुळे साहजिकच ही मुले नृत्य करण्यासाठी पाश्चात्य स्टाइलची निवड करतात. प्रत्येकामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी व सामान्य नागरिकदेखील या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशाने फ्रेंच डान्सर व मास्टर बॅले जीन जॉर्जस यांच्या जयंतीनिमित्त जागतिक नृत्य दिन साजरा केला जातो.आजच्या नृत्याबद्दल बोलायचे म्हटले तर, जेव्हा एखाद्या सार्वजिनक ठिकाणी क्लासिकल नृत्य चालू असेल तर त्यामध्ये रस असणारे किंवा तेच प्रेक्षक दिसतील. याउलट वेस्टर्न गाणी असेल तर रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस त्याकडे आकर्षित झालेला दिसतो.- रत्ना वाघ, अध्यक्ष, अखिल भारतीय सांस्कृतिक संघलावणीमध्ये चेहऱ्यावरील हावभावला जास्त महत्व असते. पण पाश्चात्य नृत्यामध्ये विविध स्टाइलमध्ये स्टंट करायला मिळतो. यामुळे हिपपॉप, जाज या माझ्या आवडत्या स्टाइल्स् आहेत.-पूजा काळदंते, नृत्यांगनाबॅले डान्सला परंपरा असली तरी इतर ज्या डान्स स्टाइल आहेत त्या करा आणि विसरा याप्रमाणे आहेत. भारत देशात परंपरेला जास्त महत्व असून या कलेच्या साक्षीदार असतात. शास्त्रीय कला या जन्मोजन्मी साथ देणाऱ्या आहेत.- मनीषा साठे, ज्येष्ठ नृत्यांगनाजागतिक नृत्य दिन आपल्याकडेदेखील साजरा करावा असे नेहमी वाटते. ही एक कला आहे. यामध्ये पाश्चात्य व पारंपरिक नृत्य असा कोणताही फरक करता कामा नये. कारण, पुण्यामध्ये शिकण्यासाठी परदेशातून आलेली कित्येक मुले आमच्या अ‍ॅकॅडमीमध्ये लावणी शिकून उत्साहाने बाहेर पडले आहेत. आपण त्यांची संस्कृती शिकण्यास जेवढे उत्साही असतो, तेवढेच ते देखील उत्साही असतात.- आशिष लोखंडे, कोरिओग्राफररिअ‍ॅलिटी शो या काही दिवसांसाठीच असतात. दुर्देव आहे की, तरुणांना जे दिसेल साहजिकच ते त्या गोष्टीकडे ओढले जातील. शास्त्रीय नृत्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे कलाकारांनीदेखील पुढे येऊन मुलांना पारंपरिक नृत्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमांना तरुणांनी उपस्थित राहिले पाहिजे, तेव्हाच त्यांना त्याचे महत्त्व कळेल. हे नृत्य अध्यात्माकडे नेणारे आहे. ते संस्कार होण्यासाठी मुलांनी हे नृत्य आत्मसात केले पाहिजे.- स्वाती दैठणकर, ज्येष्ठ नृत्यांगना