कोरेगाव भीमा : येथील ३२ मंडळांच्या वतीने एक गाव एक शिवजयंतीसारखा सामाजिक उपक्रम राबवित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात सॅनिटायझरचे वाटप व औषध फवारणी करून शिवजयंती साजरी करतानाही सामाजिक भान जपण्याचा आदर्श तरुणांनी घालून दिला असल्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.
अखिल कोरेगाव भीमा शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले. तरुणाईने गावातील लोकांसाठी सॅनिटायझर वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी संपूर्ण गावात सॅनिटायझर फवारणी करून पोलीस कर्मचारी व नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, अरविंद गव्हाणे, भाजपचे संपत गव्हाणे, योगेश गव्हाणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सचिन मोरे, अशोक केदार, किशोर शिवणकर, योगेश नागरगोजे, अभिषेक सव्वाशे, शुभम फडतरे, महेश फडतरे, निखिल गव्हाणे, स्वप्निल फडतरे, शुभम गव्हाणे, निखिल दौंडकर, प्रदीप काशीद, प्रवीण फडतरे, राकेश शिवले, हृषीकेश गव्हाणे , शुभम पवार आदी उपस्थित होते.
विनोद घुगे यांनी सांगितले की, कोरेगाव भीमामध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून गावातील सामजिक एकता राखण्याचे काम तरुण वर्ग करीत आहे. त्याचप्रमाणे गावातील तरुणांनी सर्व महापुरुषांच्या ही जयंती एकत्रितपणे साजरी करून समजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कोरेगाव भीमा येथील गावातील ३२ मंडळांनी गतवर्षीपासून एक गाव एक शिवजयंती असा उपक्रम सुरू केला. यात सर्व धर्म व जाती पंथाच्या नागरिकांच्या खांद्यावरून शिवरायांची पालखी संपूर्ण गावात पारंपरिक वाद्य व दांडपट्ट्याच्या खेळात मिरवणूक काढण्यात येते. शिवजयंती आयोजकांच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
३१ कोेरेगाव भीमा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना पोलीस निरीक्षक.