शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पाझर तलावात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: March 29, 2017 23:43 IST

पुणे येथून आपल्या मित्रांबरोबर फिरण्यासाठी पुरंदर तालुक्यात आलेल्या युवकाच्या भिवरी येथील

गराडे : पुणे येथून आपल्या मित्रांबरोबर फिरण्यासाठी पुरंदर तालुक्यात आलेल्या युवकाच्या भिवरी येथील आंबराईवाडी पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अफशान सादिक शेख (वय २२, रा. कोंढवा खुर्द) असे या युवकाचे नाव असून रहिमान मौलाना शेख (वय ४५, घोरपडी पेठ) यांनी या घटनेची खबर सासवड पोलिसांना दिली आहे. दरम्यान बुडाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. शेख हा त्याच्या पाच मित्रांसह फिरण्यासाठी आला होता. दुपारी तीनच्या दरम्यान ते सारे बापदेव घाटाजवळच आंबराईवाडी तलावात पोहोण्यासाठी उतरले. अफशान बुडून दिसेनासा झाला. सर्व मित्र पाण्यातून बाहेर आले व त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना याबाबत कल्पना दिली. याबाबत सासवड पोलिसांना घटनेची माहिती दिली. भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते ८ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली. परंतु मृतदेह कोठेही सापडला नाही. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविली. अग्निशमन दलाचे जवान शिवतारे यांनी पाणबुडीच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली. अखेर तिसऱ्या दिवशी बुधवार २९ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना बोटीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.