खेड तालुका छावा शाखेचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन छावा संघटना पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ ढोले पाटील व खेड तालुका अध्यक्ष सौरभ दौंडकर यांनी केले होते. छत्रपती संभाजीराजे भोसले छावाप्रमुख धनंजय जाधव यांचे हस्ते छावा संघटना शाखेचे उद्घाटन झाले.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, छावा संघटनेच्या माध्यमातून तरुणांना उद्योग व व्यवसाय उभा करण्यासाठी विविध महामंडळ व बॅंकेच्या माध्यमातून एकत्रितपणे व्यवसाय सुरू करून कार्यकर्ते तरुणांना उद्योजक बनवण्याचा उद्देश लवकरच पूर्ण करू. दरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजेंनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाला अभिवादन करून राजगुरू वाड्याचे प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्रातून काहीही मदत लागली तर ती करू, असे आश्वासन दिले.
०७ राजगुरुनगर छावा
छावा शाखेच्या फलकाचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले व इतर.