पुणे : ‘विद्यार्थ्यांमध्ये न्यायसंस्थेत जाण्याचा कल वाढवला पाहिजे. ही जबाबदारी सर्व शिक्षणसंस्थांची आहे. आजचा तरूण वकिल हा वकिली पेशात काम करण्यापेक्षा कॉर्पोरेट जगताकडे आकर्षिला जात आहे’ अश्ी खंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित यांनी व्यक्त केली. भारती विद्यापीठ अभिमता विश्वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजने ‘सुवर्ण महोतसवी व्याख्यानमालेतील न्यायालयीन कारकीर्द : तरूणाईचा कल या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा, अॅड अश्विन माधवन, अॅड रॉडर रायडर, जी. जयकुमार, रजिस्ट्रार अभय नेवगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘तरुणांनी वळावे न्यायव्यवस्थेकडे’
By admin | Updated: January 18, 2016 01:01 IST