शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही व्हा पुणेकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 01:15 IST

पुण्यात एकदा व्यक्ती आली, की ती तावूनसुलाखून निघते. मांजर कशी कुठूनही पडली तरी चार पायांवरच उभी रहाते, तसाच मीही, कितीही टीका झाली तरी इथे दोन पायांवर उभा आहे

पुणे : पुण्यात एकदा व्यक्ती आली, की ती तावूनसुलाखून निघते. मांजर कशी कुठूनही पडली तरी चार पायांवरच उभी रहाते, तसाच मीही, कितीही टीका झाली तरी इथे दोन पायांवर उभा आहे. त्यामुळे जयंतराव ‘पुणेरीपण’ अनुभवण्यासाठी पुण्यात याचं... असा खास ‘पुणेरी’ टोला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना लगावला... आणि एखाद्या मुरब्बी नेत्याप्रमाणे तितक्याच दिलखुलासपणे त्यांनी हसून बापट यांना दाद दिली.निमित्त होते, कृष्णकांत कुदळे फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याचे. बापट आणि पाटील यांच्यात रंगलेल्या विनोदात्मक वाक्युद्धाने उपस्थितांचे मनोरंजन झाले. पाटील यांनी भाषणात ‘प्रत्येक गोष्टीला भाग्य लागते, खरे तर मंत्रिमहोदयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्याची प्रथा आहे; पण बापट उशिरा आले आणि तो मान मला मिळाला... शेवटी नशीब असावे लागते... मी ‘नशिबाबद्दलच’ बोलत आहे, असा मिस्कील टोला त्यांनी बापट यांना मारला. पण, पक्के पुणेकर असलेले बापट स्वस्थ बसतील तरचं नवल! त्यांनीही मग, पाटील यापुढील काळात ‘माजी’ राहतील असे वाटत नाही. ते मंत्रीही होऊ शकतात, ही संधी मी त्यांना दुसऱ्यांना द्यायला तयार आहे, असा पलटवार केला आणि सभागृहात हशा पिकला. या वेळी जयंत पाटील यांच्या हस्ते वामन जाधव यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, डॉ. परवेझ ग्रांट यांना शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार तसेच मुक्ता मनोहर यांना सुनील दत्त पुरस्कार तर अभिनेत्री अनुजा साठे हिला नर्गिस दत्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष कृष्णकांत कुदळे आणि मंगल कुदळे उपस्थित होते. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष मोहन टिल्लू यांनी आभार मानले. > चांगले बघण्याचा प्रयत्न करावाविधानसभेत आम्ही एकमेकांच्या गचांड्या धरतो, असे सरसकट लोकांना वाटते. मतभेद असतात; पण आम्ही विषयाचा आग्रह धरतो. संसदीय मार्गाने काही गोष्टी कराव्याच लागतात. विधानसभेत कटू प्रसंग आले, तर वातावरण चांगले कसे करायचे, याचा प्रयत्न पाटील करतात, असा आवर्जून उल्लेखही बापट यांनी केला. तसेच समाजात नेहमीच वाईट घडते, अशी एक निराशेची मानसिकता तयार झाली आहे; पण वाईट थोडं घडतं आणि चांगलंच जास्त घडत असतं. नेहमी चांगलं बघण्याचाच प्रयत्न करावा, याकडेही बापट यांनी लक्ष वेधले. तर, जाता-जाता जयंत पाटील यांनी पुण्यात भांडवलदारांची हॉस्पिटल्स खूप असून, सामान्यांचंच भांडवल अधिक जातं, असे सांगून पुण्याच्या आरोग्यक्षेत्रातील वास्तवावर बोट ठेवले. अनेक वर्षांपासून कुदळे राष्ट्रवादीचे उपाध्यक्षच आहेत. कुदळे यांच्याकडे पाहून ‘अजून राष्ट्रवादीतचं आहात ना,’ अशी मिस्कील टिप्पणी करीत ‘बघा जरा विचार करा,’ असे सांगून बापट यांनी पाटील यांना सूचित केले.