शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच आमचे ‘फ्रंटलाईन वर्कर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:12 IST

दीपक कुलकर्णी पुणे : पुणे, मुंबईसह राज्यात कोरोना दिवसेंदिवस भयावह रूप धारण करतो आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन ...

दीपक कुलकर्णी

पुणे : पुणे, मुंबईसह राज्यात कोरोना दिवसेंदिवस भयावह रूप धारण करतो आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन यंत्रणा आपापल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.यात लसीकरणाची मोहीमसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचवेळी हिंजवडी, माण परिसरात एक स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. रहिवाशांनी परिसरातील शासनाकडून दुर्लक्षित अशा ४५ वर्षांपुढील ‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. आणि यावेळी मोठमोठ्या सोसायट्या, इमारती कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे समोर येत आहे. परंतु, याही विदारक परिस्थितीत सोसायट्यांचे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, कचरा गोळा करणारे, घरातील कामवाल्या महिला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे कर्तव्य समजून हिंजवडी, माण परिसरातील काही सोसायट्यांनी ४५ वर्ष पूर्ण केलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

रहिवासी रवींद्र सिन्हा म्हणाले, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक, सफाई कामगार, कचरावेचक यासारखी अनेक मंडळी कोरोनाकाळात देखील आपले काम करत आहे. त्यांच्यात ४५ वर्षांपुढील अनेक जण आहेत. त्यांना कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे जमत नाही. आतापर्यंत जवळपास १००हून अधिक अशा वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा भाग असलेली मेगापोलिश सोसायटीचे अंशुल गुप्ता म्हणाले, मोठमोठ्या टाऊनशीपमध्ये साधारण २० ते ५० फ्रंटलाईन कर्मचारी काम करत असतात. त्यांच्या आरोग्याला धोक्यात घालून ते आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतात.

....

‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथिल करावी...

केंद्र व राज्य सरकारने आता सफाई कामगार, सुरक्षारक्षक, कचरा वेचणारे, कामवाल्या महिला यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या पंक्तीत आणून त्यांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी. ही परवानगी मिळाली तर लसीकरण मोहीम अधिक व्यापक होईल. या माणसांची कुटुंब सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल.

- रवींद्र सिन्हा, रहिवासी