शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप निश्चित

By admin | Updated: February 2, 2016 01:13 IST

बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप यांची आज सोमवार, दि. १ रोजी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

बारामती : बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप यांची आज सोमवार, दि. १ रोजी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जगताप हे बारामतीचे सर्वांत तरुण नगराध्यक्ष ठरणार आहेत. अधिकृत घोषणा गुरुवारी (दि. ४) होणार आहे.सुभाष सोमाणी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. विद्यमान नगरसेवकांपैकी आठ जण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. आपली वर्णी लागावी यासाठी त्यांनी अजित पवारांकडे पाठपुरावा केला होता. बारामतीचा नगराध्यक्ष कोण होणार, याकडे परिसरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. जगताप हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.योगेश जगताप यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष, तसेच नंतर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष होते. या वेळी ते दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मागील कार्यकालात ते बारामती नगरपरिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती होते. योगेश जगताप हे राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी रक्तदान शिबिरांसह विविध उपक्रम राबवीत असतात. अजित पवार यांच्या सूचनेनुसार रविवारी (दि. ३१) आठ इच्छुकांनी आपले अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुपूर्त केले. त्यात योगेश जगताप, विक्रांत तांबे, श्याम इंगळे, नितीन बागल, जयसिंग देशमुख, प्रशांत भोईटे, संजय लालबिगे व राजेंद्र बनकर यांचा समावेश होता.