पुणे : योग आणि भरतनाट्यम् यांच्यातील साम्य डॉ. अनुराधा जोग यांच्या शिष्या नृत्यातून उलगडून दाखविणार आहेत.निमित्त आहे ते पुणे आंतरराष्ट्रीय योग फेस्टिव्हलचे. पुण्यात पहिल्यांचा ६ ते ८ मार्च या कालावधीत हा आंतरराष्ट्रीय योग फेस्टिव्हल होत आहे.याविषयी माहिती देताना डॉ. जोग म्हणाल्या, ‘‘भरतनाट्यम् ही हठयोग कला आहे. योग आणि भरतनाट्यम् यांच्यातील परस्परसंबंध फेस्टिव्हलअंतर्गत उलगडून दाखविला जाणार आहे. दि. ७ आणि दि. ८ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. जोग यांच्या शिष्या सुकन्या गुरव आणि ऋचिका अय्यर या सादरीकरण करणार आहेत. भरतनाट्यम्वर आधारित डीव्हीडीचे प्रकाशन या वेळी होणार आहे.योग फेस्टिव्हलचे उद्घाटन दि. ६ रोजी साकळी ११.३० वाजता राष्ट्रसेवा दल येथे होणार आहे. दि. ७ रोजी सकाळी ८.३० वाजता पाण्यावर बसून योग प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. ही प्रात्यक्षिके टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळाच्या तलावात दाखविली जाणार आहेत.दि. ८ रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळात चर्चासत्र होणार असून त्यात शेर्ली टेलास, पंतप्रधांनांचे योगगुरू डॉ. नागेंद्र, माजी सीबीआयप्रमुख कार्तिकेयन, ब्रह्मश्री पत्रीजी, ज्येष्ठ योगगुरू हंसाजी जयदेव, डॉ. विजय भटकर सहभागी होणार आहेत. तर, १२ वाजता ‘योग तपस्विनी’ पुरस्काराचे वितरण होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम राष्ट्र सेवा दल येथे होणार आहेत. (प्रतिनिधी)
भरतनाट्यम्द्वारे उलगडणार योग
By admin | Updated: March 4, 2015 00:43 IST