शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब शेतीतून लाखोंचे उत्पन्न

By admin | Updated: October 2, 2015 01:01 IST

अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात इस्राईल या प्रगत देशातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पुणे विभागातील पहिलाच डाळिंब शेतीचा यशस्वी अभिनव प्रयोग शेतकरी अमित कुंजीर यांनी राबवला आहे

संदीप नवले, पाटेठाण अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात इस्राईल या प्रगत देशातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पुणे विभागातील पहिलाच डाळिंब शेतीचा यशस्वी अभिनव प्रयोग शेतकरी अमित कुंजीर यांनी राबवला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी काळ्या मातीतून खरोखर सोने पिकवले असून, त्यातून ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. जिद्द, चिकाटी, सातत्य व प्रामाणिकपणे कष्टाला जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर कष्टाचे निश्चितच सोने होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दौंड तालुक्याच्या पश्चिमेला शेवटच्या टोकाला असलेल्या मिरवडी (ता. दौंड) या गावातील हे शेत आहे. संपूर्ण उत्पादित मालाची परदेशात विक्री केली जाते. पुण्याजवळील चासकमान या ठिकाणी बांधकाम खात्यात नोकरीला असलेले अमित कुंजीर यांना उपजतच शेतीची आवड होती. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा त्याग करून शेतीची कास धरली. आणि १९९५ मध्ये एक एकर डाळिंब लागवड करून डाळिंब शेती करण्यास सुरुवात केली. शेतीमधील आधुनिकता पाहण्यासाठी इस्राईल, जपान, ब्राझील, आॅस्ट्रेलिया या देशांना भेटी देऊन माहिती मिळवली. खुरपणीवर भर आणि विशेष म्हणजे एक एकराच्या झाडांचे लागवडीपासून छाटणीपर्यंतचे काम एक पुरुष व महिला करतात. साध्या झाडांना काठीचा आधार दिला जातो. परंतु या झाडांना जाळीचा आधार दिला आहे. त्यामुळे मजुरीत बचत होते. कोणतीही रासायनिक औषधं न वापरता सेंद्रिय शेतीवर आधारित लिंबाच्या झाडांच्या पाल्याचा रस, निरमा पावडर, लसूण बुकटी याचा वापर औषध फवारणी म्हणून केला जातो. झाडांना रोग जडू नये म्हणून ट्रायको, लसणाचे ड्रींचिंग करतात. विशेष म्हणजे दोन झाडांच्या मध्ये तुळशीची लागवड केली आहे.