शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘होय’ मी माझ्या पुण्यात आहे ‘सुरक्षित’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:11 IST

पुण्यातील रस्ते ‘ती’चे, ही माणसंदेखील ‘ती’ची, ‘ती’च्या पुण्यात ‘ती’ला कसली भी‘ती’, हा विचार महिलांमध्ये रुजावा, आपल्याच शहरात आपण सुरक्षित असल्याची भावना ‘ती’ला दिलासा देणारी ठरावी आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’ने नेहमीच काळाच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार केला.

पुणे : पुण्यातील रस्ते ‘ती’चे, ही माणसंदेखील ‘ती’ची, ‘ती’च्या पुण्यात ‘ती’ला कसली भी‘ती’, हा विचार महिलांमध्ये रुजावा, आपल्याच शहरात आपण सुरक्षित असल्याची भावना ‘ती’ला दिलासा देणारी ठरावी आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’ने नेहमीच काळाच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार केला. ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी मध्यरात्री महिला मिडनाइट बाइक रॅलीतून जागर केला. या रॅलीमध्ये सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, हडपसर, येरवडा आणि पिंपरी-चिंचवडमधून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.फिनोलेक्स पाइप्स प्रस्तुत ‘लोकमत आपले बाप्पा’ पॉवर्ड बाय कॅलिक्स ग्रुप आॅफ कंपनीज अंतर्गत या बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खत्री बंधू पॉट आइस्क्रिम अँड मस्तानी, एचपी ज्वेलर्स, हॅशटॅग, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज भोसरी, केकीज इंडिया प्रा.लि सहप्रायोजक होते. पुणे शहर वाहतूक पोलीस, महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महावीर जैन छात्रालयाने सहकार्य केले होते. अभिनेत्री ऊर्मिला कोठारे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, नगरसेविका मंजूषा नागपुरे, साईदिशा माने, वर्षा साठे, अश्विनी कदम, रूपाली धाडवे, राणी भोसले, अश्विनी भागवत, मनीषा वाबळे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, केकीज इंडियाच्या संचालिका स्वाती वायदंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला व ‘लोकमत’ सखी मंचच्या सदस्या आणि समन्वयक सहभागी झाल्या होत्या.‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल पडले. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ मिळाले. रोजच्या जगण्याची लढाई लढताना बळ मिळाले. महिलांच्या मिडनाइट बाइक रॅलीने ‘सुरक्षित पुणे’चा जयघोष करण्यात आला. ‘सुरक्षित पुणे’ असा संदेश देणारे फलक महिलांनी हातात घेतले होते. आजूबाजूला घडणाऱ्या मन सुन्न करणाºया स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे रस्त्याने जाताना ‘आपण सुरक्षित आहोत का?’ हा प्रश्न प्रत्येक महिलेला सतावत आहे. मात्र, पुण्याने संपूर्ण राज्याला महिला सुरक्षेबाबत आदर्श घालून दिला आहे. त्याचा नारा या रॅलीमध्ये करण्यात आला. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.>रात्रीच्या वेळीही महिला पुण्यात दुचाकीवरून फिरू शकतात, हा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. विविध भागातून निघालेली रॅलीची गुडलक चौकातून महावीर जैन विद्यालय येथे समाप्ती झाली. यावेळी समस्त महिलांच्या उपस्थितीत सुरक्षिततेसंबंधी प्रतिज्ञा घेण्यात आली. हिंजवडीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. ‘मीच होईन माझा आधार’ कारण ‘मीच आहे सक्षमतेची मूर्ती’ असा विश्वास ‘ती’च्यामध्ये निर्माण करण्यात आला.