शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा वसंतोत्सव होणार ‘कट्यारमय’

By admin | Updated: January 5, 2016 02:20 IST

सूर, लय आणि ताल यांच्या सुंदर मिलाफातून साकार होणारा ‘वसंतोत्सव’ यंदा दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. पुरुषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं. जितेंद्र अभिषेकी

पुणे : सूर, लय आणि ताल यांच्या सुंदर मिलाफातून साकार होणारा ‘वसंतोत्सव’ यंदा दि. १५ ते १७ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. पुरुषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या अद्वितीय संगीताने सजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाच्या १००व्या प्रयोगाचे औचित्य साधून रसिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महोत्सव विनामूल्य असणार आहे, अशी घोषणा गायक राहुल देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ‘वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात येते. न्यू इंग्लीश स्कूल रमणबाग येथे सायंकाळी ५.३० ते १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. १५) सुरुवात सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने होईल. त्यानंतर किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांचे गायन होईल. प्रसिद्ध सुफी गायक वडाळी ब्रदर्स यांच्या सुफी संगीताने सांगता होईल. मीरा प्रसाद यांच्या सतारवादनानंतर सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाचा शंभरावा प्रयोग हे दुसऱ्या दिवसाचे (दि. १६) खास आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये प्रथमच लाईव्ह आॅपेरा प्रकाराने या नाटकाचे सादरीकरण करण्यात येईल. यामध्ये राहुल देशपांडे हे खां साहेबांच्या भूमिकेत असतील, सुबोध भावे हे कविराजांच्या भूमिकेत दिसतील, तर महेश काळे हे सदाशिवची भूमिका साकारतील. विशेष म्हणजे या प्रयोगास सध्या गाजत असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात खाँ साहेबांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची उपस्थिती असणार आहे.तिसऱ्या दिवशी (दि. १७) प्रल्हाद तिपानिया यांचे गायन, तबलावादक कुमार बोस यांचे तबलावादन तसेच जॉर्ज ब्रूक्स व राहुल देशपांडे यांच्या गायन व सॅक्सोफोनच्या फ्युजन रसिकांना अनुभवता येईल.