शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मराठी नाटकांचे यंदा बेळगावात बीजारोपण

By admin | Updated: November 25, 2014 00:01 IST

यंदा बेळगाव येथे होत असलेल्या नाटय़ संमेलनानिमित्त मराठी नाटकांची परंपरा रुजविण्याकरिता बेळगाव नाटय़ परिषदेने पुढाकार घेतला आहे.

पुणो : यंदा बेळगाव येथे होत असलेल्या नाटय़ संमेलनानिमित्त मराठी नाटकांची परंपरा रुजविण्याकरिता  बेळगाव नाटय़ परिषदेने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातील मराठी विद्याथ्र्याच्या नाटय़विषयक कार्यशाळा घेण्याबरोबरच  एकांकिका स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे.  स्पर्धेमधील विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण हे  संमेलनाचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरणार आहे. 
कर्नाटकात वीस वर्षामध्ये मराठी नाटकांचा पडदा उघडलेला नाही. त्यामुळेच तिथे अद्याप नाटय़चळवळीचे बीज रुजलेले  नाही. मराठी भाषिक महाविद्यालयांमध्ये  पथनाटय़ाचे सादरीकरण होते. मात्र, तेही हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये. ही सर्व पाश्र्वभूमी असताना  यंदाचे 95वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन बेळगावामध्ये होत आहे, ही तेथील मराठी भाषकांसाठी निश्चितच आनंदाची  गोष्ट आहे. 
संमेलन कोठे होत आहे, हा महत्त्वाचा मुद्दा नाही, हे यापूर्वीच आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तरीही संमेलनाच्या निमित्ताने विविध वाद उकरून काढीत राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 
‘लोकमत’शी बोलताना वीणा लोकूर म्हणाल्या, ‘‘मुंबई, पुणोसारख्या महाविद्यालयांमध्ये ‘पुरुषोत्तम’, ‘फिरोदिया’सारख्या एकांकिका स्पर्धा घेण्यात येतात. मात्र, अशा प्रकारच्या स्पर्धा बेळगावसारख्या प्रांतात पाहायला मिळत नाही. संमेलनाचे औचित्य साधून महाविद्यालयीन विद्याथ्र्याच्या कार्यशाळा घेऊन त्यांच्यासाठी एकांकिका स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
बेळगावमध्ये संमेलन होत असल्याने तरुणांमध्ये  उत्साहाचे वातावरण आहे. पडद्यावरील 
अभिनेते प्रत्यक्षात पाहायला 
मिळणार असल्याची ‘क्रेझ’ त्यांच्यात आहे. 
तुम्हीही संमेलनात सहभागी व्हा आणि त्याचा एक भाग होण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन 
तरुणांना करीत  असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
 
मराठी नाटकांची परंपरा तेथे रूजू शकलेली नाही. म्हणूनच याभागातील 18 ते 2क् महाविद्यालयांमधील मराठी तरूणांसाठी नाटय़विषयक कार्यशाळा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
- वीणा लोकूर,
 नाटय़ परिषद, बेळगाव