शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

यंदा घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिंकली शर्यत

By admin | Updated: January 4, 2016 01:07 IST

यावर्षी घराचे स्वप्न उराशी बाळगून ६७ वर्षीय लता करे या तिसऱ्यांदा रविवारी शरद मॅरेथॉन स्पर्धेत अनवाणी धावल्या आणि त्यांनी ‘हॅट्ट्रिक’ मिळवली

बारामती : यावर्षी घराचे स्वप्न उराशी बाळगून ६७ वर्षीय लता करे या तिसऱ्यांदा रविवारी शरद मॅरेथॉन स्पर्धेत अनवाणी धावल्या आणि त्यांनी ‘हॅट्ट्रिक’ मिळवली. पहिल्या वर्षी पतीचे हृदय ‘चालावे’ यासाठी तर यंदा घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या धावल्या. अडीच किलोमीटरचे अंतर धावत नगर परिषदेसमोरची ‘क्रॉस लाईन’ पार केली आणि बारामतीकरांनी टाळ््या वाजवून प्रतिसाद दिला.माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेची सुरुवात सकाळी ६.३० वाजता झाली. त्यामध्ये इतर वयोगटातील स्पर्धकांसह करे देखील सहभागी झाल्या. झेंडा फडकताच लाल साडी परिधान केलेल्या करे भरधाव वेगाने धावल्या. कडाक्याच्या थंडीत वयाची तमा न बाळगता त्या अनवाणी धावल्या.करे यांना ३ मुली, १ मुलगा, पती, सून, नातवंडे असा परिवार आहे. तिन्ही मुलींचे विवाह झाल्यानंतर हे कुटुंब पाच वर्षांपूर्वी बारामती तालुक्यात वास्तव्यास आले आहेत. बुलढाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. करे यांच्या यशाच्या हॅट्ट्रिकने हा निर्णय सार्थ ठरवला आहे.