शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा रब्बी सरासरी ओलांडणार

By admin | Updated: September 28, 2016 04:37 IST

खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात

बारामती : खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र, परतीच्या पावसाने रब्बी हंगाम सरासरी ओलंडणार, अशी शक्यता आहे. आतापर्यंत तालुक्यात ११२ टक्के व सरासरी ३७७.१० मिलिमीटर पाऊस झाल्याचे तालुका कृषी विभागाने सांगितले. बारामती तालुक्यात सरासरी ३५२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सलग चार वर्षे दुष्काळामुळे बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. पाणीटंचाईची समस्या कायमच या परिसरात गंभीर होती. टंचाईच्या काळात तब्बल ३४ टँकरने या भागात पाणीपुरवठा सुरू होता. यंदाही पावसाळ्यातील पहिले तीन महिने कोरडे गेल्याने सलग पाचव्या वर्षीदेखील दुष्काळाचे अरिष्ट्य ओढवणार का, या भीतीने शेतकरी हवालदिल झाला होता. दुष्काळाच्या शक्यतेने बाजारपेठेतदेखील मंदीचे वातावरण होते. मात्र, परतीच्या पावसाने यंदा बारामती तालुक्यावर चांगलीच कृपा केली. मागील आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे ओढे-नाले खळाळू लागले आहेत. बारामती तालुक्यात जलयुक्त शिवारची ६९२ कामे झाली आहेत. खोलीकरण झालेल्या कामांमधून तालुक्यात ७, ४४९ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढेल.बारामती हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारीच्या पेरणीखाली मोठे क्षेत्र असते. रब्बी हंगामात बारामती तालुक्यात सरासरी ३७ ते ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा पाऊसमान चांगला असल्याने याच लागवड क्षेत्रात २ ते ३ हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रब्बीमध्ये उशिरा गहू आणि हरभऱ्याच्यादेखील पोरण्या होतील असा अंदाज तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी) उंडवडीमध्ये सरासरीच्या ५० टक्केच पाऊस...कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार परिसरात सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे या परिसराला अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. असे असले, तरी खडकवासला कालव्यातून आवर्तन मिळाल्यास या परिसरातदेखील रब्बी हंगाम जोर धरेल. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती येणार...सलग चार वर्षांच्या दुष्काळामुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले होते. यंदा पावसाने सरासरी ओलंडल्यानंतर जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्याची आशा आहे. पाऊस लांबल्याने यंदादेखील चिंतेचे सावट होते. शेवटच्या टप्प्यातदेखील पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याने आशा सोडली होती. मात्र, वरुणराजाने कृपा केली. जिरायती पट्ट्यात दुग्धव्यावसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. टंचाईच्या काळात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले होते. पाऊस झाल्याने आता चारा पिकांच्या लागवडीही मोठ्याप्रमाणात होतील. त्यामुळे पुन्हा एकदा दुग्धव्यवसायाला गती मिळेल.