शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बटाटा कडाडणार!

By admin | Updated: November 6, 2014 00:53 IST

लहरी हवामानाचा फटका रब्बी हंगामातील बटाटापिकाला बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेले बटाटापीक वाया गेले आहे.

विलास शेटे, मंचरलहरी हवामानाचा फटका रब्बी हंगामातील बटाटापिकाला बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेले बटाटापीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी नवीन बटाटालागवड करण्यास धजावत नाही. बियाण्याचे वाढलेले बाजारभाव, वातावरणातील फरक यांमुळे मंचर बाजार समितीत शेतकरी बटाटा खरेदीस येत नसल्याने अक्षरश: शुकशुकाट पसरला आहे. या वर्षी ५० टक्के बटाटा लागवड होणार असून, त्यामुळे भविष्यात खाण्याच्या बटाट्याचा तुटवडा भासून बाजारभाव कडाडणार आहेत.मागील २५ वर्षांतील सर्वांत कमी लागवड या वर्षी बटाट्याची झाली आहे. नोव्हेंबर महिना हा बटाटा लागवडीसाठी महत्त्वाचा असतो. मात्र, प्रथमच बाजार समितीत बटाटा वाणखरेदीसाठी शेतकरी येत नसल्याने अक्षरश: शुकशुकाट पसरला आहे. एरवी १५ जानेवारीला बटाटा वाणविक्री बंद होते. या वर्षी ती नोव्हेंबरअखेरीस बंद होण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला बटाट्याला बाजारभाव जास्त असूनही मागणी होती. चार हजार रुपये क्विंटल या दराने बटाटा वाण विकत घेऊन त्याची लागवड शेतकऱ्यांनी केली. दोन महिन्यांपूर्वी लागवड झालेला बटाटावाण अक्षरश: वाया जाण्याची चिन्हे आहेत. लहरी हवामानाचा फटका बटाटापिकाला बसला असून, अनेक रोगांचा विळखा पडला आहे. लाल कोळी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना शर्थ करावी लागत आहे. सुरुवातीस लागवड केलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी बटाटालागवड करण्यास फारसा उत्सुक नाही. बटाटावाणाच्या बाजारभावाने या वर्षी उच्चांक गाठला. क्विंटल तीन ते चार हजार रुपये हा बाजारभाव पाहून अनेक शेतकऱ्यांनी बटाटालागवड करण्याचा बेत रद्द केला. बटाटापिकाला थंडी पोषक असते. मात्र, या वर्षी थंडी फारशी नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात सार्थरता आहे. (वार्ताहर)