शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

यवतच्या यादववाडीत पावसाविना पूर

By admin | Updated: September 15, 2016 01:40 IST

दौंड तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारलेली आहे. यवत स्टेशननजीक असलेल्या यादववाडी मध्ये मात्र पाऊस नसतानाही पुराचा अनुभव शेतकरीवर्गाला आला.

यवत : दौंड तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारलेली आहे. यवत स्टेशननजीक असलेल्या यादववाडी मध्ये मात्र पाऊस नसतानाही पुराचा अनुभव शेतकरीवर्गाला आला.यवत व खामगाव परिसरात नवीन मुठा उजवा कालव्याच्या वितरिका क्र. १८ व क्र. १९ वरून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. खोडसाळपणे कोणी तरी वितरिका क्र. १८ चा भराव फोडल्याने अनेकांच्या शेतात पाणी घुसले, तर यादववस्ती (यवत) येथे काही घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.याबाबतची सविस्तर माहिती अशी : नवीन मुठा उजवा कालव्याच्या वितरिका क्र.१८ व क्र.१९ वरून पाण्याचे आवर्तन काल रात्री सुरू करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास वितरिका क्र.१८ ला कासुर्डी गावाच्या हद्दीत कोणी तरी भगदाड पाडले. वितरिका क्र.१८ व जुना कालवा एकमेकांना विभागून जात असलेल्या ठिकाणी पाटबंधारे विभागाने जुन्या कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर तेथे भराव टाकला होता. या ठिकाणावरून नवीन मुठा कालव्याचे पाणी खामगावकडे जात होते. जुन्या कालव्यात टाकलेल्या भरावाला रात्रीच्या सुमारास भगदाड पाडल्याने वितरिका क्र.१८ मधील पाणी जुन्या कालव्यातून वितरिका क्र.१९ मध्ये थेट येऊ लागले. यामुळे आधीच पाणी भरून वाहणाऱ्या वितरिका क्र.१९ मधून अतिरिक्त होणारे पाणी मोठ्या दाबाने आजूबाजूच्या शेतात व वस्त्यांमध्ये घुसले. ही बाब यादववाडी परिसरात राहणारे सचिन धनशेट्टी यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने मध्यरात्रीच्या सुमारास यवत स्टेशन रोड येथील संजय जगताप यांना याबाबत माहिती दिली.संजय जगताप यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्री १ वाजण्याच्या सुमारास पाणी घुसलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व याची माहिती पाटबंधारे विभागाचे यवत शाखा क्र.२ चे शाखा अधिकारी के. बी. खुटवड यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार जगताप यांनी दोन्ही वितरिकांचे पाणी बंद केले. यानंतर मध्यरात्री पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.वितरिका क्र.१८ फोडण्यासाठी संबंधित व्यक्तीने जे.सी.बी.मशिनचा वापर केला असल्याची शक्यता आहे. भराव फोडलेल्या ठिकाणी तेथून मोठमोठे दगड बाजूला काढल्याचे दिसून येत होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे आज अनेकांची शेती पाण्याखाली गेली होती. सकाळच्या सुमारास यवतचे उपसरपंच सुभाष यादव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.