शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

यवतला १ कोटींचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:31 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरून मुंबईकडे गुटखा घेऊन जाणाºया टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून यवत पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोमधून सुमारे एक कोटी

यवत : पुणे-सोलापूर महामार्गावरून मुंबईकडे गुटखा घेऊन जाणाºया टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून यवत पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोमधून सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. शासनाने गुटख्यावर बंदी घातलेली असताना बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणारे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय आहे. यवत पोलिसांनी केलेली कारवाई जिल्ह्यातील मोठी कारवाई आहे.शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यवत पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार : आयशर टेम्पोमधून शासनाने बंदी घातलेला पानमसाला व गुटखा पुणे-सोलापूर महामार्गाने पुण्याकडे जात असल्याची माहिती गोडसे यांना मिळाली. पाटस टोलनाका येथे सहायक फौजदार संतोष शिंदे व सहकाºयांनी टेम्पो पकडण्यासाठी सापळा लावला. परंतु चालकाने त्यांना हुलकावणी देऊन टेम्पो सुसाट वेगात पुण्याकडे नेला. या टेम्पोचा शिंदे यांनी मोटारसायकलवरून पाठलाग केला. तसेच, त्याला अडविण्यासाठी पो. नि. गोडसे यांनी फोनवरून सहायक फौजदार वाजे यांना सूचना दिल्या. वाजे हे पोलीस ठाण्यातून बॅरिकेड लावत असतानाच संशयित टेम्पो यवतमधून भरधाव वेगाने पुढे निघाला. तेव्हा पो. नि. गोडसे हे पोलीस नाईक दीपक पालके व प्रवीण भोईटे सरकारी वाहनातून टेम्पोच्या मागावर कासुर्डी टोलनाक्याकडे निघाले. त्या वेळी कासुर्डी टोलनाका येथे लावलेली टीम व कासुर्डी टोलनाक्याचे कर्मचारी यांना सतर्क करण्यात आले. संशयित टेम्पोचा कासुर्डी टोलनाक्यापर्यंत सरकारी वाहनाने पाठलाग करून टोलनाक्यावरील टीम व टोलनाक्याचे कर्मचारी यांच्यासह टेम्पो ( एमएच ४३ वाय ५२५१) ताब्यात घेतला. टेम्पोमध्ये ड्रायव्हर सत्यपाल गोकूळराव सिंह (वय ४२, रा. बरवासी, ता. नवलगढ, जि. झुन्मुनु, राजस्थान) व त्याचा साथीदार बिरबल गोपीराम मीना यांना पोलिसांनी अटककेली आहे.टेम्पोमध्ये ४९ पांढºया गोण्यांमध्ये गुटखा व पानमसाला असा संशयित माल मिळून आला. हा टेम्पो पोलीस ठाण्यात आणला, टेम्पोमध्ये ४९ गोण्यांमध्ये दहा लाख पाच हजार पन्नास गोवा गुटख्याच्या पुड्या आढळल्या. बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत एक कोटी पाच लाख आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस नाईक दीपक पालके, प्रवीण भोईटे, गणेश पोटे, सहफौज. शिंदे, वाजे, कॉन्टेबल संपत खबाले, गजाभाऊ खत्री, विनोद रासकर, प्रशांत कर्णवर, हरीश शितोळे यांचा सहभाग होता.