पुणे : इंडियन मुजाहीदीनचा संस्थापक सदस्य यासीन भटकळ याला हजर करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने कारागृहाच्या अधिकार्यांच्या दिले आहेत. एटीएसच्या पुणे शाखेने भटकळची ९० दिवसांची कोठडी संपल्यामुळे ती वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावर न्यायालयाने यासीन भटकळला हजर करण्याचा आदेश दिला. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी एटीएसच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता यासीन हा सध्या दिल्लीमध्ये असल्यामुळे त्याला तातडीने मंगळवारी न्यायालयात हजर करणे शक्य नाही. त्यामुळे त्याला पुण्यात आणण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. यासीन भटकळ हा १३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बफोटामधील आरोपी आहे. त्याला आणण्यासाठी एटीएसचे एक पथक दिल्लीला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. भारत -नेपाळ सीमेवर दिल्ली स्पेशल सेल व गुप्तचर पोलिसांनी पकडले होते़ सर्वप्रथम त्याला दिल्लीतील बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कटामध्ये अटक करण्यात आली होती़
यासिन भटकळला पुण्यात आणणार : न्यायालयाचे आदेश
By admin | Updated: June 2, 2014 22:22 IST