शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वरुडेकरांची होतेय पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: May 3, 2015 05:51 IST

पिण्याच्या पाण्यासाठी वरूडे येथील जनतेला आतापासूनच संघर्ष करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या गावात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही.

वाफगाव : पिण्याच्या पाण्यासाठी वरूडे येथील जनतेला आतापासूनच संघर्ष करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या गावात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या तरी प्रशासनाकडून पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथे अतिशय जुन्या काळातील एक हातपंप आहे. त्यावरच सध्या येथील बहुतेक लोक अवलंबून आहेत.हातपंपाला देखील अतिशय कमी पाणी उपलब्ध आहे. एक हंडा भरण्यासाठी जवळपास अर्धा तास लागतो, अशी माहिती येथील रहिवासी देत आहेत. या गावाची लोकसंख्या जवळपास २०००च्या घरात आहे. त्यामुळे येथे दररोज कमीतकमी २ टँकरची आवश्यकता आहे. मग कुठे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोडा फार मार्गी लागेल. परंतु, गेल्या एक महिन्यापासून टँकरची मागणी करूनदेखील येथे पाणी उपलब्ध झाले नाही. बहुतेक नागरिक गाव सोडून पाहुण्यांकडे राहण्यासाठी जाऊ लागले आहेत. पिण्याच्याच पाण्याची अवस्था अतिशय बिकट आहे तर वापरण्याचे पाणी मिळविणे अतिशय कठीण झाले आहे. रात्री-अपरात्रीच हातपंपावर नंबर लागलेले असतात. कधीकधी पाण्यासाठी भांडणेदेखील होतात. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश घ्यावा लागतो व नंतरच पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश आल्याशिवाय ग्रामीण भागातील पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला पाणी मिळणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे.(वार्ताहर)