शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: May 7, 2016 05:14 IST

इंदोरी (ता. मावळ) येथील महाराष्ट्र राज्य महसूल खात्याच्या गट नंबर ४२४ मधील २५ गुंठे जागेवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी अतिक्रमण केले असून, वडगाव मावळचे

वडगाव मावळ : इंदोरी (ता. मावळ) येथील महाराष्ट्र राज्य महसूल खात्याच्या गट नंबर ४२४ मधील २५ गुंठे जागेवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी अतिक्रमण केले असून, वडगाव मावळचे तहसीलदार यांनी मंडलाधिकारी तळेगाव दाभाडे यांना अतिक्रमण काढण्यासाठी लेखी आदेश दिले असतानादेखील अधिकारी आणि तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यामधील असलेल्या आर्थिक संगनमतामुळे कित्येक वर्षांपासून अतिक्रमण काढण्यात आले नाही.सदर शासकीय जमिनीवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी पाणी अडवण्यासाठी बांधकाम केले असून, शासकीय जागेत डांबरी रस्तादेखील बनवण्यात आला असल्याचा अहवाल मंडलाधिकारी यांनी दिला आहे. तोलानी एज्युकेशन फाउंडेशन डॉ. नंदलाल तोलानी चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. नंदलाल तोलानी यांनी इंदोरी येथील शेतजमीन खरेदी साठेखताने घेऊन त्या जमिनीवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता वेळोवेळी १० लाख चौ. फूट अनधिकृत बांधकाम केले आहे. मंडलाधिकारी यांनी मात्र शासकीय जमिनीवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशनचे अतिक्रमण केले नसल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी शासकीय मोजणी केलेली नाही. अर्जदारांचा जबाबही घेतला नाही. अशा प्रकारे तोलानी एज्युकेशन फाउंडेशन व डॉ. नंदलाल तोलानी यांनी वेळोवेळी कूळकायदा शाखेकडे खोटी शपथपत्रे, चुकीची माहिती सादर करून कूळकायदा विभागाची फसवणूक केली आहे, असा आरोप इंदोरी येथील शेतकरी प्रदीप तुकाराम भालेकर यांनी केला आहे. (वार्ताहर)तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. परंतु ते काही दिवसांपूर्वी हटवण्यात आले होते. ट्रस्टने पुन्हा अतिक्रमण केले असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू व दोन दिवसांत अतिक्रमण काढून टाकू. अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करू. - शरद पाटील, तहसीलदार, मावळशासनाच्या जागेवर आमचे कोणतेही अतिक्रमण नाही. शासनाचा भूखंड रिकामा आहे. शासकीय अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. जमिनीचा सर्व व्यवहार आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण करून केला आहे. शिवाय शासकीय जागेतून डांबरी रस्ता काढण्यात आला आहे. - अ‍ॅड. सादिक अली सय्यद, कायदेशीर सल्लागार, तोलानी फाउंडेशन