शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लेखणीचा प्रकाश मंदावला : कुलकर्णी

By admin | Updated: March 27, 2017 03:22 IST

ज्येष्ठ पत्रकार, संपादक गोविंद तळवलकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेतील तेजस्वी तारा निखळला आहे

पुणे : ज्येष्ठ पत्रकार, संपादक गोविंद तळवलकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेतील तेजस्वी तारा निखळला आहे. प्रभावशाली संपादकांच्या दुसऱ्या फळीमध्ये तळवलकर अग्रस्थानी होते. लेखणी गाजवणारा हा महान संपादक वाचनवीर होता. त्यांच्या जाण्याने लेखणीचा प्रकाश मंदावल्याची भावना ज्येष्ठ संपादक एस. के. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने तळवलकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साखरीकर, जयराम देसाई, पराग करंदीकर, डॉ. अरुण खोरे, संघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, ‘तळवलकरांचा यशवंतराव चव्हाणांशी विशेष स्नेह होता. राजीव गांधी यांनी चर्चेसाठी बोलावलेल्या ज्येष्ठ पत्रकारांमध्ये तळवलकरांचाही समावेश होता. संपादकाला संपादकाने कसे वागवले पाहिजे, याचे ते स्वत: एक उत्तम उदाहरण होते.’तर, पवार यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण रिव्हीएराला राहत असताना शरद पवार व मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते आतमध्ये एका पत्रकाराशी बोलत असल्याचे समजले. बऱ्याच वेळाने ते पत्रकाराला सोडायला बाहेर आले. तेव्हा त्यांनी शरद पवारांची ओळख तळवलकरांशी करून दिली. शरद पवारांनी त्यांना जाणीवपूर्वक तळवलकरांच्या संपर्कात राहण्यास सांगितले होते. तळवलकर अत्यंत स्पष्टवक्ते होते. पत्रकारिता, व्यासंग आणि लिखाण हे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. उत्तम समीक्षा, रसग्रहण करीत त्यांनी जगभरातील विचारवंत आणि लेखक मराठी वाचकांपर्यंत पोचवले.’या वेळी करंदीकर, डॉ. खोरे, साखरीकर यांनीही त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. बढे यांनी प्रास्ताविक केले तर देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी तळवलकरांना श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)