शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी विचारातून लेखन करणार

By admin | Updated: January 11, 2017 02:42 IST

डॉ. न. म. जोशी हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अत्यंत सुपरिचित असे नाव. ‘नि:स्पृह’, ‘कथानम’, ‘मोहनदास करमचंद’, ‘चरित्रकथा’ अशा दर्जेदार

नम्रता फडणीस / पुणेडॉ. न. म. जोशी हे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अत्यंत सुपरिचित असे नाव. ‘नि:स्पृह’, ‘कथानम’, ‘मोहनदास करमचंद’, ‘चरित्रकथा’ अशा दर्जेदार लेखनातून वाचकांसमोर विविधांगी विषयांची वैचारिक दालन त्यांनी खुली केली. आज (दि.११) ते ८१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.* शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील प्रवासाविषयी काय वाटते?- साहित्य व शिक्षण प्रवाह माझ्या दृष्टीने वेगळे नाहीत. साहित्याला शिक्षणातून सामुग्री मिळते आणि साहित्याचा फुलोरा हा शिक्षणातून निर्माण होतो. या दोन्ही क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळाल्याने मी खूप समाधानी आहे.* सध्याच्या सामाजिक परिस्थितीकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहाता?- स्वातंत्र्यचळवळीचा मी साक्षीदार ठरलो. त्यावेळी स्वराज्य मिळविण्यासाठी जो काम करेल तो देशभक्त, अशी देशभक्तीची एक साधी सोपी व्याख्या होती. पण आता सुराज्यासाठी जो काम करेल तो देशभक्त असा या शब्दाचा अर्थ आहे. स्व पासून आपण पर्यंत हा प्रवास झाला पाहिजे. राष्ट्रीय उन्नतीसाठी सामाजिक विचार निर्मितीमधून प्रकाशाची बेट वाढली तर समाजात माजलेला अहंकार दूर होईल. * समाज परिवर्तन कसे होऊ शकते? - साहित्य, समाज आणि शिक्षण मी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि पाहात आहे. ज्यांच्या हातात प्रशासनाची सूत्रे आहेत अशा प्रशासकांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत कुणालाच देश चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी चारित्र्य संवर्धन प्रबोधिनी स्थापन झाली पाहिजे. * डॉ. आंबेडकर यांच्यावर एखादा ग्रंथ लिहिण्याचा काही मानस?- हो नक्कीच. आंबेडकरांची चरित्रे पुष्कळ लोकांनी लिहिली. परंतु आंबेडकरांचा विचार निळ्या क्रांतीच्या विचारातून पाहिला गेला. मात्र त्यांच्या विचारामध्ये भगवा त्यागाचा, पांढरा शांतीचा आणि हिरवा सृजनाचाही विचार आढळतो. राष्ट्रध्वजातील रंगांचे प्रतिक आंबेडकरांच्या विचारांमध्ये पाहायला मिळते. आंबेडकरांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्षित करा असा मंत्र दिला. शिक्षण हा त्याचा पाया होता. याच विचारांवर आंबेडकरांचे चरित्र लिहिणार आहे. * यापुढचा तुमचा प्रवास कसा असेल? - डॉ. आंबेडकर यांच्या दोन खंडांची मी भाषांतरे केली. आंबेडकरांच्या समग्र अभ्यासामुळे त्यांचे विचार नसानसात भिनले आहेत.वयाच्या सातव्या वर्षापासून शिक्षणात सुरू झालेला प्रवास ७५ वर्षे अखंडपणे सुरू राहिला. आजवरच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवावर ‘शेवटचा तास’ हे ललित लेखन करण्याचाही विचार आहे.* डॉ. आंबेडकर यांच्यावर तुम्ही लेखन केले आहे त्याविषयी ?- १९८५ साली मी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात्मक ग्रंथाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या दोन खंडांची मी भाषांतरे केली. मुंबई विद्यापीठातल्या अ‍ॅना फर्नांडिस हिने माझ्या मार्गदर्शनाखाली आंंबेडकरांवर पीएचडी केली आहे. आंबेडकरांच्या समग्र अभ्यासामुळे त्यांचे विचार नसानसात भिनले आहेत.