पुणे : अस्सल हिऱ्यांच्या लखलखाटात न्हालेल्या, नाजूक आकर्षक नक्षीकामात कोरलेल्या दागदागिन्यांचा खजिना पुणेकरांसाठी येत्या शनिवार व रविवारी खुला होणार आहे. ख्यातनाम ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व मुंबईचे प्रसिद्ध हिरे व्यापारी हर्निश शेठ यांचे इंट्रिया प्रदर्शन शनिवारपासून हॉटेल जे. डब्ल्यू मॅरीएट येथे सुरू होत आहे. दागिने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात जर ते रत्नजडित हिऱ्याचे दागिने असतील तर त्याचा आनंद निराळाच असतो. नेत्रदीपक, उत्कृष्ट कलाकुसर, नक्षीकाम असणाऱ्या दागिन्यांची भुरळ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पुणेकरांना पडत आहे. पुणेकरांच्या या चोखंदळ वृत्तीसाठी ‘इंट्रिया’ या दागिन्यांचे प्रदर्शन पुन्हा सज्ज होत आहे. या प्रदर्शनात हिरे, पाचू, माणिक यांचे आकर्षक दागदागिने, कर्णफुले, बारीक कलाकुसरीने नटलेले नेकलेस, ब्रेसलेट, कडे, पेडंट्स असे वैविध्यपूर्ण दागिने पाहण्यास मिळणार आहेत. याबरोबरच मनाचा ठाव घेणाऱ्या, प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या नाजूक, मोठ्या अंगठ्या आकर्षण ठरणार आहेत. स्त्रियांच्या दागिन्यांबरोबरच पुरुषांसाठी ब्रेसलेट, कफलिंक्स ही येथे पाहावयास मिळतील. व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन दागिन्यांची रचना करण्यात आली आहे. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टीवेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नामांकित उद्योजक, शिक्षणसंस्थांचे प्रमुख, व्यावसायिक आदी अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला यापूर्वी आवर्जून भेट देऊन वाखाणले आहे. (प्रतिनिधी)नेत्रदीपक, उत्कृष्ट कलाकुसर, नक्षीकाम असणाऱ्या दागिन्यांची भुरळ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पुणेकरांना पडत आहे. पुणेकरांच्या या चोखंदळ वृत्तीसाठी ‘इंट्रिया’ या दागिन्यांचे प्रदर्शन पुन्हा सज्ज होत आहे. व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन दागिन्यांची रचना करण्यात आली आहे.प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य असते. दागिना हा त्या व्यक्तिमत्त्वाला साज चढविणारा असावा, या पद्धतीने त्यातील रचनाकौशल्य करण्याचा प्रयत्न केला आहे. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना आकर्षित करणारा आहे. प्रत्येक दागिना हा स्टायलिश आणि ट्रेंडी असावा याकडे कटाक्ष राखण्यात आला आहे. - पूर्वा दर्डा-कोठारी, प्रख्यात ज्वेलरी डिझायनर
लखलखत्या हिऱ्यांच्या दागिन्यांचा ‘इंट्रिया’ला साज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 02:40 IST