शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘कुस्ती’तही ‘तिने’ मारली बाजी

By admin | Updated: November 7, 2016 01:23 IST

कुस्ती म्हटलं की हा पुरुषी खेळ. अनेक वर्षांपासून या खेळावर पुरूषांची मक्तेदारी राहिली आहे. या रागंडी खेळाचे क्षेत्रही महिलांनी पादाक्रांत केले आहे.

डिंभे : कुस्ती म्हटलं की हा पुरुषी खेळ. अनेक वर्षांपासून या खेळावर पुरूषांची मक्तेदारी राहिली आहे. या रागंडी खेळाचे क्षेत्रही महिलांनी पादाक्रांत केले आहे. आंबेगाव तालुक्यातील साकोरे या गावातील स्वरा व सिद्धी, मुलींनी पोखरी येथे झालेल्या आंबेगाव तालुका महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढत यश मिळवले आहे. महाराष्ट्र केसरीचे स्वप्न उराशी बाळगून या दोघी दृष्टीने आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्वरा व सिद्धी, साकोरे (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध पहिलवान जयवंत गाडे यांच्या मुली. घरात तीन पिढ्यांपासूनच कुस्तीची परंपरा. त्यामुळे लहानपणापासूनच मुलाप्रमाणेच गाडे यांनी दोघींना कुस्तीचे बाळकडू लहानपनापासून देत आहेत. सध्या शालेय स्पर्धांबरोबरच या मुली आंबेगाव तालुक्यातील नामांकित आखाड्यात महिलांच्या कुस्तीचे फड गाजवित आहेत. त्यांचे आजोबा, वडील व जयवंत हे स्वत:ही तालुक्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या चार तालुक्यांत नामांकित पहिलवान म्हणून ओळखले जातात. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे बैलपोळ्याच्या निमित्ताने भरणाऱ्या आखाड्यातून सलग तीन वर्षे विजयी होऊन येथील मानाची चांदीची गदा त्यांनी मिळविण्याचा मान मिळविला आहे. वडिलांच्या पायावर पाय ठेवून स्वरा व सिद्धी या दोन सख्ख्या बहिणीही सध्या वडिलांकडून कुस्तीचे धडे गिरवत आहेत. स्वरा इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असून, सिध्दी आठवीच्या वर्गात शिकत आहे. एकीकडे शालेय शिक्षणाचे धडे घेता घेताच कुस्तीसारख्या नवख्या खेळातही त्या प्रावीण्य दाखवित आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या कुस्ती आखाड्यातून त्यांनी आजपर्यंत १ ढाल, २ ट्रॉफी व दोन मानाची पदकेही मिळविली आहेत. घरची परिस्थिती बेताचीच, मात्र घरातील परंपरागत कुस्तीची पे्ररणा घेऊन सध्या या दोन बहीणी कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.