शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चिंताजनक ! पुण्यात वाढतोय कोरोना, रुग्णसंख्या पोहोचली १६८३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 21:15 IST

शहरात सोमवारी महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत

ठळक मुद्देशहरात सोमवारी महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत.

पुणे - पुण्यात पुन्हा कोरोनाचा आलेख वाढताना दिसतो आहे. शहराचा पॅाझिटिव्हीटी रेट हा आता १०% पर्यंत जाउन पोहोचला आहे. पुण्यात सोमवारी एकूण १९३ नव्या रुग्णांची भर पडली. शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या १६८३ वर पोहोचली असून आज १६९ रुग्ण बरे झाले आहेत. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये सोमवारी दिवसभरात १०० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाख एक हजार ८६८ झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी होती. मात्र या आठवड्यात त्यात भर पडली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २०१४ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरात सोमवारी महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. सोमवारी दिवसभरात १९५१ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात २३८४ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ५९६ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १९१२ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७०७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७७६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९८०२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ११६ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात १३०७ रुग्णांचे गृहविलगीकरण

कोरोना पॉझिटिव्ह असलेले ७०७ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सक्रीय असलेल्या १३०७ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण २०१४ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. सोमवारी  दिवसभरात २५१ घरांना भेटी देऊन ८७२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या