शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

जागतिक बँक ‘सल्लागार’

By admin | Updated: August 14, 2015 03:08 IST

शहरांमधील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून शाश्वत विकास तसेच पर्यावरणपूरक शहरे विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने हाती घेतलेल्या ‘अमृत’ अटल नवनिर्माण

सुनील राऊत, पुणेशहरांमधील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून शाश्वत विकास तसेच पर्यावरणपूरक शहरे विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने हाती घेतलेल्या ‘अमृत’ अटल नवनिर्माण आणि शहर परिवर्तन मिशन योजनेसाठी पुणे महापालिकेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक बँक महापालिकेची सल्लागार बनणार आहे. त्यासाठी येत्या २० आॅगस्ट रोजी बँकेचे प्रतिनिधी महापालिकेस भेट देणार असून, याबाबतच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या शिवाय या योजनेमध्ये महापालिकेकडून प्रस्तावित केल्या जाणाऱ्या प्रकल्पांसाठी बँकेकडून आर्थिक मदतही करण्याची तयारी दर्शविली आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने आघाडी सरकारने शहरांच्या विकासासाठी सुरू केलेली जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) बंद केली. याच वेळी या योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉरमेशन म्हणजेच ‘अमृत मिशन’ या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतंर्गत देशभरातील तब्बल ५०० शहरांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी पुरविला जाणार असून त्यासाठी केंद्रीय अंदाजपत्रकात तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील ४३ शहरांची निवड झाली असून पुण्यासह , पिंपरी-चिंचवड शहरांचा स्वतंत्र समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रकही राज्य शासनाने नुकतेच जारी केले आहे. त्यानुसार, राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली नसली तरी, निवड झालेल्या शहरांंनी या योजनेतील सहभागासाठी शहराचा सेवास्त सुधारणा आराखडा अर्थात ‘स्लिप’ (सर्व्हिस लेवल इम्प्रूव्हमेंट प्लान) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.