शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘यशस्वी’च्या विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी कामगिरी

By admin | Updated: June 21, 2015 00:37 IST

बेळगाव येथील स्पर्धेत देशभरातील स्केटिंगपटूंनी १२१ तास सलग स्केटिंगचा विश्वविक्रम नोंदविला. त्यात चिंचवड येथील यशश्री स्केटिंग

पिंपरी : बेळगाव येथील स्पर्धेत देशभरातील स्केटिंगपटूंनी १२१ तास सलग स्केटिंगचा विश्वविक्रम नोंदविला. त्यात चिंचवड येथील यशश्री स्केटिंग क्लबच्या पाच विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमात यशस्वी सहभाग नोंदविला.शिवगंगा स्केटिंग क्लबने आयोजित स्पर्धेत ३० मे रोजी सायंकाळी सलग २४ तास स्केटिंगला सुरुवात करून आपलाच विक्रम स्पर्धकांनी मोडला. ३१ मे रोजी सलग ४८ तासांचा विक्रम पूर्ण करण्यात आला. १ जून रोजी सायंकाळी स्केटर्सनी ७ हजार ९९७ लॅप्स पूर्ण करीत एक हजार ५६५ किलोमीटरचे अंतर कापत ७२ तास ४५ मिनिटांचा विक्रम नोंदविला. २ जून रोजी सकाळी सव्वादहा वाजता ११ हजार २२० लॅप्स पूर्ण करीत २२४० किमीचे अंतर कापत चीनमधील क्लबने नोंदविलेला विक्रम मोडला. ३ जून रोजी सायंकाळी सव्वासात वाजता जल्लोषात विश्वविक्रम पूर्ण करण्यात आला. १५ हजार ७५३ लॅप्स पूर्ण करीत ३५०० किलोमीटरचे अंतर कापत पथकाने लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडियन अ‍ॅचिव्हर्स बुक आॅफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले. विश्वविक्रमासाठी प्रथमेश गोरे, प्रसाद भोईर, आदित्य कुलकर्णी, पूर्वेश देशमुख, विविन प्रज्वल या स्केटर्सना प्रशिक्षक संदीप सोळंकी, मनोज ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. (वा. प्र.)