त्यासाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा अपव्यय करण्यात येणार आहे.
दरम्यान, या बेकायदा कामांना नागरी चेतना मंच या संघटनेने याबाबत तीव्र आक्षेप घेतला आहे. संस्थेच्या कनीझ सुखरानी यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, याबाबत निर्णय होण्यापूर्वीच घाईगर्दीत कामे सुरू करण्यात आली आहेत.
या सोसायट्यांमध्ये अंतर्गत पदपथ, रस्ते डांबरीकरण, सिमेंट कॉंक्रीट रस्ते, ड्रेनेज आदी कामे आमदार स्थानिक विकासनिधीतून केली जाणार आहेत. या कामासाठी २ कोटी ३३ लाखांचा निधी मंजुर झाला आहे. या कामाचे नुकतेच भूमिपूजनही टिंगरे यांच्या उपस्थितीत झाले होते.
मार्गदर्शक तत्त्वानुसार आमदार निधीतून केवळ सरकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेवर करता येतात.
यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार निधीतून खासगी सोसायटी मध्ये कोणतेही काम करू नये. आमदार निधीतून खासगी सोसायटीमध्ये काम केली गेली असतील तर, त्या ठेकेदारांला शासनाने पैसे देऊ नये, अशीही मागणी सुखराणी यांनी केली आहे.
कोट ...................
खासगी सोसायटीमध्ये काम करणे हा शासनाच्या निधीचा अपव्यय आहे.
यामुळे आम्ही, स्थानिक विकासनिधीतून २० ठिकाणी जी कामे केली जाणार आहेत. ती सर्व कामे रद्द करावीत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
- कनीझ सुखरानी, नागरी चेतना मंच.
संबंधित कामांचा प्रस्ताव दिला आहे हे खरे आहे. ती कामे बेकायदा ठरत असतील तर प्रशासनाने नामंजूर करावीत. मात्र, यापूर्वीही आमदारनिधीतून अशी खासगी कामे झाली आहेत, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो.
- सुनील टिंगरे, आमदार.
चौकट .........
अनेक सार्वजनिक कामे निधीअभावी अपूर्ण
......................... विमाननगरमध्ये रस्ते आहेत, परंतु पदपथ नाहीत, विमाननगर मधीलच दत्तमंदिर चौक, विमानतळ रस्ता या रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. म्हाडा रस्त्यावर दुभाजकाची गरज आहे. दत्तमंदिर चौक,कैलाश सुपर मार्केट चौक या ठिकाणी दुभाजकाची गरज आहे. पथदिवे जुने असून ते बदलण्याची गरज आहे.अनेक ठिकाणी रस्त्याच्या एकाच बाजूला पथदिवे आहेत. श्रीकृण्ण हॉटेल चौक,गणपती चौक या महावितरणचे डीपी बॉक्स रस्त्यातच धोकादायक स्थितीत आहेत. ही रखडलेली सार्वजनिक कामे प्राधान्याने होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.