शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयास जागा हवी; १४ कोटी भरा

By admin | Updated: February 19, 2016 01:44 IST

येरवडा येथील शासनाच्या मालकीची ५५ गुंठे जागा पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी देण्यात येणार आहे

पुणे: येरवडा येथील शासनाच्या मालकीची ५५ गुंठे जागा पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी देण्यात येणार आहे. ही जागा सवलतीच्या दरात देण्याची मागणी पीएमआरडीए केली होती. परंतु पीएमआरडीए स्वतंत्र प्राधिकरण असल्याने सवलतीच्या दरात जागा देणे शक्य नसून, प्रस्तावित बाजार मूल्यानुसार १४ कोटी २५ लाख रुपये एकरकमी भरल्यानंतर जागेचे हस्तांतर करण्यात येईल, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने पीएमआरडीएला पाठविले आहे.पीएमआरडीएची स्थापन झाल्यानंतर कार्यालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. सुरुवातील पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणात तात्पुत्या स्वरूपात कार्यालय सुरू करण्यात आले. येथे जागा कमी पडू लागली म्हणून हे कार्यालय औंध येथील भीमसेन जोशी नाट्यगृहात हलविण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत पीएमआरडीएच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने सध्या कार्यालय सुरूअसलेली जागादेखील कमी पडत आहे. यामुळे तातडीने येरवडा येथील प्रस्तावित जागेत स्वत:चे स्वतंत्र कार्यालय सुरूकरण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येरवडा येथील जागा शासनाच्या मालकीची असून, प्राधिकरणासाठी सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु पीएमआरडीए हे स्वतंत्र प्राधिकरण असून, शासनाची जागा सवलतीमध्ये देता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सध्याच्या रेडीरेकनरच्या दरानुसार ५५ गुंठे जागा १४ कोटी २५ लाख ७७ हजार रुपयांना उपलब्ध करून देता येईल, असे स्पष्ट केले. या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. १४ कोटी रुपयेदेखील टप्प्या-टप्प्याने भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी पीएमआरडीएने केली, परंतु ही मागणीदेखील मान्य करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.