शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांच्या वस्तीत पुस्तकांचा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:48 IST

वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा अर्थ कळेल... वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा हक्क मिळेल... या विचाराने वस्तीवस्तीतल्या विहारांमध्ये ग्रंथालय सुरू करून त्यातून पुस्तकांचा जागर करण्याचा विडा पुण्यातील उच्चशिक्षित विवेकी तरुण-तरुणींनी उचलला आहे.

धनाजी कांबळे पुणे :वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा अर्थ कळेल... वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा हक्क मिळेल... या विचाराने वस्तीवस्तीतल्या विहारांमध्ये ग्रंथालय सुरू करून त्यातून पुस्तकांचा जागर करण्याचा विडा पुण्यातील उच्चशिक्षित विवेकी तरुण-तरुणींनी उचलला आहे. यात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजा ढाले यांची नात भाग्येशा कुरणे हिने पुढाकार घेतला आहे. ‘विहार तिथं ग्रंथालय’ असे त्यांच्या उपक्रमाचे नाव असून, शिक्षण, रोजगार सांभाळून तरुण-तरुणी पुण्यातील वाड्या, वस्त्यांमध्ये हे अभियान राबवीत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशातील एक सूत्र घेऊन भाग्येशाला हा उपक्रम सुचला. पुण्यातील दत्तवाडी येथील विहारातून सुरु झालेला हा उपक्रम सध्या ६ विहारांमध्ये सुरु असून, रत्नागिरीपर्यंत याचा सेतू बांधला गेला आहे. झोपडपट्टीतील मुलांच्या गुणवत्तेसाठी साऊ-रमाई शैक्षणिक प्रकल्पही राबवला जातो. त्यासाठी दररोज चार-पाच तास वेळ देऊन दहा ते बारा तरुण-तरुणी शिक्षणाचा जागर करीत आहेत.आतापर्यंत हजारो पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप विहारांमधून करण्यात आले आहे. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प राज्यभरात पोहोचविणार असल्याचे भाग्येशाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुस्तके आणि आर्थिक स्वरुपात मदत मिळाल्यास या उपक्रमास बळ मिळणार आहे.‘बार्टी’ने द्यावा मदतीचा हातडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे (बार्टी) या उपक्रमाला मदतीचा हात मिळाल्यास महाराष्ट्रातील हजारो विहारांच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोचवण्याचे मोठे काम होऊ शकते. तसेच वाचनसंस्कृतीला चालना मिळून झोपडपट्टीतील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण वाढू शकते. त्यासाठी बार्टीने पुढाकार घेऊन या उपक्रमाला मदत करावी, अशी अपेक्षा भाग्येशा आणि तिच्या टीमने बोलून दाखविली.