शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भीमा पाटसच्या कामगारांचा एल्गार

By admin | Updated: October 30, 2016 02:47 IST

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २० कोटी रुपये देणी थकविल्याच्या निषेधार्थ कारखान्याच्या कामगारासह त्यांच्या कुटुंबीयांनी मूक मोर्चा काढला.

पाटस : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २० कोटी रुपये देणी थकविल्याच्या निषेधार्थ कारखान्याच्या कामगारासह त्यांच्या कुटुंबीयांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात कामगारांच्या कुटुंबीयांतील महिला, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कारखानास्थळावरून मोर्चा निघाला. हा मोर्चा पाटस गावात आल्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि काही ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. या वेळी भीमा पाटस कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिवंगत मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्याला रमेश थोरात, योगेंद्र शितोळे, सत्वशील शितोळे यांनी पुष्पहार समर्पित केला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी भीमा कामगार संघाचे पदाधिकारी केशव दिवेकर यांनी प्रास्ताविक करून कामगारांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती सांगून याला जबाबदार कारखाना व्यवस्थापन असल्याचे दिवेकर म्हणाले. या वेळी भीमा कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर, कामगार संघटनेचे पदाधिकारी, सरपंच वैजयंता म्हस्के, उपसरपंच मंगेश दोषी, माजी सरपंच शीतल भागवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रमेश थोरात म्हणाले, की कारखाना व्यवस्थापनाने कामगार आणि सभासदांवर वाईट वेळ आणली आहे. मीदेखील या कारखान्यात उपाध्यक्ष होतो. मात्र आमच्या कारकिर्दीत कामगारांचे पगार कधीही थकले नाहीत, तर सभासदांच्या उसाला योग्य भाव दिला होता. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी किती पारदर्शक कारभार केला, याचे उदाहरण म्हणजे कामगारांची थकलेली देणी आणि सभासदांच्या भावनेशी केलेली थट्टा होय. (वार्ताहर)कामगारांवर काळी दिवाळीभीमा साखर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे म्हणाले, की कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगारांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.भीमा पाटस कारखान्यात तांत्रिक अडचणीमुळे नुकसान झाले. त्यामुळे गाळपही कमी झाले. परिणामी कारखाना अडचणीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यात कोणीही राजकारण करू नये.- आमदार राहुल कुल, अध्यक्ष, भीमा पाटस कारखाना.