यावेळी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, सांगुर्डीचे सरपंच वसंत भसे, येलवाडीच्या सरपंच हिराबाई बोत्रे, उपसरपंच वर्षा बोत्रे, माजी उपसरपंच रणजित गाडे, तानजी गाडे ,सुदाम गाडे, रामभाऊ गाडे, ग्रा.पं. सदस्य तानाजी गाडे, विलास गाडे,कैलास गाडे, सुदाम गाडे, सुधिर गाडे, प्रकाश बोत्रे आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत देहू ते येलवाडी परिसरात रस्ता रुंदीकरण व विस्तारिकरणातून रस्ते, येलवाडी व देहूला जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल बांधण्यात आला आहे. परंतु पुलाच्या येलवाडी गावच्या हद्दीतील पूल व येलवाडीकडून येणारा नवीन रस्ता स्थानिक शेतकरी व जिल्हा प्रशासन यांच्यातील भूसंपादनाचा तिढा न सुटल्याने अद्याप जोडलेला नव्हता. शासनाने लाखो रुपयांचा निधी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यासाठी दिलेला असताना काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे पुल वापराविना पडून राहिला होता. त्यामुळे देहूला येणारे भाविक व स्थानिक नागरिकांची अडचण होत होती. हा पूल सुरू करणासाठी सांगुर्डीचे सरपंच वसंत भसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस वसंत भसे यांनी प्रशासकीय पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीच आश्वासक कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण केले होते. अखेर वसंत भसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला आणि उपोषणाला न्याय मिळाला असून आजपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
१४ चाकण रस्ता
देहू ते येलवाडी पुलाच्या कामाचा शुभारंभ करताना मान्यवर.