शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सिंहगडच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:11 IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडींचे नियोजन करणाºया तज्ज्ञांकडून सिंहगड घाट रस्त्यावरील दरडींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानुसार कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील.

खडकवासला : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील दरडींचे नियोजन करणाºया तज्ज्ञांकडून सिंहगड घाट रस्त्यावरील दरडींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यांच्या अहवालानुसार कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. अनेक ठिकाणी दरडी मुरमाड व ढिसूळ असून कोसळण्याच्या शक्यतेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी आणि वाहतुकीस सध्या बंद ठेवण्याचा निर्णय वनसंरक्षण विभागातर्फे घेतला आहे. तथापि तातडीची कामे करून रविवारपर्यंत सिंहगड पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे.रविवारी सिंहगड घाटात दरड कोसळल्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, घाटात तातडीच्या उपाययोजनेस सुरुवात केली आहे. वनसंरक्षकांच्या प्रसंगावधानाने दरड कोसळूनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, सुट्टीमुळे गडावर आलेले शेकडो पर्यटक दरड कोसळल्यामुळे अडकले होते. पावसाळा सुरू झाल्यापासून दरडप्रवण क्षेत्रावर वनविभागाचे आणि वनसंरक्षण समितीचे कर्मचारी लक्ष ठेवून असल्यामुळे रविवारी गडावरील अपघात टळला असल्याचे स्पष्ट झाले आहे.शासकीय पातळीवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आमदार भीमराव तापकीर, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्यासह वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनसंरक्षण विभागाने तत्काळ कामाला सुरुवात केली आहे. गाडीवरील वाहनतळापासून खाली तीन किमी अंतरापर्यंत धोकादायक दरड आहे. या दरडीचा मलाव मुरमाड असून सिंहगडावर झालेल्या संततधार पावसामुळे ढिसूळ झाला आहे. तो अचानक कोसळू शकतो. असा धोकादायक मलाव स्वत:हून ढासळवून घेऊन १२५ अंशाच्या कोनात तिरकी भिंत केल्यास धोका कमी होऊ शकतो, असे वन विभागाचे प्रादेशिक उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी स्पष्ट केले. द्रुतगती मार्गावरील दरडींचे नियोजन करणाºया पायोनियर, स्टार आणि मेकाफेरी या एजन्सी वन विभागाच्या संपर्कातआहेत.