शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोडचे काम १८ महिन्यांत सुरू

By admin | Updated: May 14, 2016 00:33 IST

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पीएमआरडीएच्या हद्दीतील रिंग रोडसंदर्भातील सर्व प्रश्न मार्गी लावून येत्या १८ महिन्यांत प्रत्यक्ष काम

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पीएमआरडीएच्या हद्दीतील रिंग रोडसंदर्भातील सर्व प्रश्न मार्गी लावून येत्या १८ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा डीपीआर जुलै महिन्यात सादर झाल्यानंतर त्याला देखील राज्य शासन तत्काळ मान्यता देईल, असे आश्वासन त्यांनी येथे दिले.पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या प्रश्नांबाबत शुक्रवारी पुण्यात बैठक घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे मुख्य कार्याकारी अधिकारी महेश झगडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, दोन्ही महापालिकांचे आयुक्त, यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.फडणवीस म्हणाले की, पीएमआरडीएच्या रिंग रोडची अलायमेन्ट आणि राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अलायमेन्ट काही ठिकाणी एकत्र येत आहे. ज्या ठिकाणी दोन्ही अलायमेन्ट एकत्र येतात, यामध्ये काही बदल करून पीएमआरडीए तो पूर्ण करले. यामुळे रिंग रोडच्या हद्दीमध्ये काही बद्दल होणार आहेत. हे बदल करून प्रस्ताव राज्य शासनाला सादर झाल्यानंतर त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल. त्यानंतर रिंग रोडचा डीपीआर करून व टेंडर करून येत्या १८ महिन्यात प्रत्येक्ष रिंग रोडचे काम सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प विकास आराखडा (डीपीआर) करण्याचे काम सुरु असून, तो जुलैअखेरपर्यंत राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे हा अहवाल सादर झाल्यानंतर शासन तत्काळ मान्यता देईल आणि शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा विषय देखील लवकरच मार्गी लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)