शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण, ९ महिने रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान काम बंद ठेवण्यात ...

भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान

काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाले नसून पुढील १० दिवस काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे ८० दिवसांत पूर्ण होणाऱ्या कामाला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ लागणार आहे. मागील ९ महिने रस्ता बंद असून, याचा उद्योग-व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती, यामुळे मागील सहा महिन्यांपासून वाहतूक बंद होती. सदरच्या दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रु. निधी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडे मंजूर करण्यात आला होता.

१० फेब्रुवारीपासून भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून सदरचे काम ८० दिवसांत ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते.त्यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भोर-महाड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, महाड बांधकाम विभागाकडून दिलेली ३० एप्रिलची मुदत संपून जवळजवळ एक महिना अधिक झाला तरीदेखील अद्याप काम पूर्ण झाले नसून पुढील दहा ते पंधरा दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागणार असून त्यानंतर रस्ता वाहतुकीस सुरू होणार असल्याचे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. म्हणजे पावसाळा सुरू होणार आणी वाहतूक सुरळीत होणार आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही त्यामुळे भोर-महाड वाहतूक बंद असल्याने कोकणात जाणारे पर्यटक प्रवासी व्यापारी नाराजी व्यक्त करीत आहेत.

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात सुरू असलेले संरक्षक भिंत काम.