शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पालखी महामार्गाच्या कामाला वेग येणार

By admin | Updated: January 8, 2017 03:20 IST

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा महामार्ग, महामार्गावरून शहरालगत होणारे बाह्यवळण मार्ग, तसेच पालखी मुक्का

जेजुरी : आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाला वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा महामार्ग, महामार्गावरून शहरालगत होणारे बाह्यवळण मार्ग, तसेच पालखी मुक्कामतळांची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे तांत्रिक विभागाचे सचिव डी. ओ. तावडे यांनी शनिवारी केली. पाहणीबाबत त्यांनी कोणतीही माहिती देण्यास मात्र नकार दिला असला तरीही येत्या १० तारखेला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेच अधिकृत माहिती देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंडळाचे सचिव डी. ओ. तावडे यांनी हडपसरपासून वाल्हेपर्यंतच्या महामार्गाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत या विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास चिटणीस, शाखा अभियंता डी. वाय. हुंडेकरी, पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता डी. के. इंगळे, पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण आदी प्रशासकीय अधिकारी होते.तावडे यांनी सासवड, वाल्हे येथील पालखीतळाची पाहणी केल्यानंतर जेजुरी येथील नियोजित पालखीतळाचीही पाहणी केली. यात केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार या मार्गाची पाहणी करीत आहोत. या महामार्गावरून आळंदी ते पंढरपूर माऊलींचे वारकरी जात असतात. त्यांच्यासाठी त्यांना हा महामार्ग जागतिक दर्जाचा व हरित महामार्ग (ग्रीन कॉरिडॉर) बनवायचा आहे. यात महामार्गाची आजची परिस्थिती, मार्गावरील बाह्यवळण रस्ते, आदींबाबतची स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व स्वत: पाहणी केली. जेजुरी पालखीतळाची पाहणी करताना भाजपाचे कार्यकर्ते, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सचिन पेशवे, शहराध्यक्ष अशोक खोमणे, प्रसाद अत्रे, राजेंद्र शेवाळेही उपस्थित होते. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हे दोन्ही पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे नुकतेच वर्ग करण्यात आलेले आहेत. प्राधिकरणाकडून या दोन्ही मार्गांचे काम होणार आहे. त्यासाठी आपण पाहणी करण्यासाठी येथे आलेलो आहोत. यापेक्षा अधिक माहिती स्वत: मंत्रिमहोदय नितीन गडकरीच देतील.- डी. ओ. तावडे, सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तांत्रिक विभाग