शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती भागात ५५ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या महिनाभराच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात, २४ बाय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या महिनाभराच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात, २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेतील ५५ किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करता आले आहे़

या योजनेत गेल्या दोन वर्षांपासून ४३२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला जलद गतीने करता आल्याची माहिती महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली़

शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेत सुमारे ४० टक्के पाण्याची गळती होत असल्याने, ही गळती थांबविणे व शहराच्या सर्व भागात समान पाणी पुरवठा करण्यासाठी सदर योजना राबवित आहे. योजनेतंर्गत शहरात नवीन जलवाहिन्यांचे जाळे तयार करावे लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात विशेषत: बाजार पेठेच्या परिसरात वाहतूककोंडी न होता जलवाहिन्या टाकण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेला पेलणे सहज शक्य झाले़ लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता या वर्दळीच्या भागांत रस्ते खोदून जलवाहिन्या टाकणे आणि वाहतूक नियोजन करणे त्रासदायक ठरणारे होते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात वाहनांची व नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने या रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यावर प्रशासनाने भर दिल्याने कोणत्याही अडथळ्याविना हे काम गेल्या महिनाभरात पार पडले आहे़

--

८० हून अधिक पाण्याच्या टाक्या बांधणार

शहरासाठी २ हजार ५५० कोटी रूपयांची २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठीचे काम फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू करण्यात आले आहे़ हे काम एल अ‍ॅण्ड टी आणि जैन इरिगेशन या कंपन्यांना देण्यात आले आहे. योजनेंतर्गत शहरात सर्वत्र नवीन जलवाहिनी टाकून ८० हून अधिक पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत़ तसेच सर्वत्र पाणी मिटरही बसविण्यात येणार आहेत़