शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खानवटे रेल्वे उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू

By admin | Updated: February 9, 2017 02:56 IST

खानवटे येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या वेगात सुरू झाले आहे. दौंड तालुक्यातील तसेच कर्जत, करमाळा नागरिकांना पुणे-सोलापूर महामार्गाला

राजेगाव : खानवटे येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या वेगात सुरू झाले आहे. दौंड तालुक्यातील तसेच कर्जत, करमाळा नागरिकांना पुणे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या भिगवण-राशीन रस्त्यावर असणाऱ्या या पुलाचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत ‘लोकमत’ वेळोवेळी पाठपुरावा केला होता. उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर जुलै २०१६ मध्ये येथील शेतकऱ्यांनी सेवा रस्ता तयार करण्यासाठी व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी उड्डाणपुलासाठी जाणार आहेत. त्या जमिनींचे संपादन करून भरपाई देण्यासाठी आंदोलन करून काम बंद केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे जात असताना (दि. २४ जुलै) येथे थांबून शेतकऱ्यांकडून समक्ष माहिती घेतली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे भूसंपादन प्रक्रिया वेगाने मार्गी लागल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडून समजली. येथे उड्डाणपूल नसल्याने परिसरातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, प्रवासी यांची होणारी गैरसोय लवकरच संपणार आहे. याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कंपनीचे अभियंता व कामगार अहोरात्र अद्ययावत मशिनरी व यंत्रणेसह राबवत आहे. विलंबाने सुरू झालेले काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी काम वेगात सुरू आहे. शेतकरी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. (वार्ताहर)