शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कासाबाई रस्त्याचे काम बेकायदेशीर

By admin | Updated: January 11, 2017 01:56 IST

०१४ मध्ये यवत-पोंढे-कासाबाईवस्ती रस्त्यासंदर्भात तत्कालीन दौड तहसीलदार यांनी नवीन रस्ता तयार करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचा

यवत : २०१४ मध्ये यवत-पोंढे-कासाबाईवस्ती रस्त्यासंदर्भात तत्कालीन दौड तहसीलदार यांनी नवीन रस्ता तयार करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचा निकाल बारामतीच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे.शेतातील उभी पिके भुईसपाट करून शेतातील पाईपलाईनसह सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान करून पोलीस बंदोबस्तात रस्ता बनविण्याचे काम १५ आॅगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आले होते. याबाबत न्याय मिळविण्यासाठी तेथील शेतकरी अशोक मलभारे, उत्तम मलभारे व इतरांनी न्यायलयात धाव घेतली होती. या दाव्याचा निकाल बारामती दिवाणी न्यायलायाने दिला असून, वादींचा दावा खर्चासह मंजूर करण्यात आला आहे. दौंडचे तत्कालीन तहसीलदार यांनी दावा मिळकतीमधून नवीन रस्ता तयार करण्यासाठी केलेला आदेश बेकायदेशीर असल्याचे जाहीर करून सदर आदेश रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याचबरोबर वादींच्या क्षेत्रातून कोणताही बेकायदेशीर नवीन रस्ता तयार करू नये, अशी निरंतर ताकीद न्यायलायाने दिली आहे.१५ आॅगस्ट २०१७ रोजी यवत-पोंढे-कासाबाईवस्ती रस्त्याच्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली होती. या वेळी गट क्र. २९३ व २९४ मधील शेतकऱ्यांनी याला विरोध असल्याचे सांगितले होते. मात्र, दौंडचे तत्कालीन तहसीलदार यांनी २४ फुटी रस्ता तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपस्थित पोलीस अधिकारी व मंडल अधिकारी यांनी दिली. या वेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ४ जेसीबी यंत्रे, १० ते १५ ट्रॅक्टर व मजुरांच्या साह्याने मंडल अधिकारी, गावकामगार तलाठी व पंचायत समितीचे उपअभियंतादेखील उपस्थित होते.या वेळी उभ्या पिकांचे, फळबागांचे कर्ज घेऊन केलेल्या पाईपलाईनचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान केले असल्याचा दावा अशोक मलभारे व इतर शेतकऱ्यांनी दाखल केला होता. महाराष्ट्र शासन, तहसीलदार, मंडल अधिकारी यवत, गावकामगार तलाठी यवत, गटविकास अधिकारी पंचायत समिती दौड, सदानंद वामन दोरगे इतरांच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. (वार्ताहर)न्यायालयात सादर केले पुरावे माजी उपसरपंच सदानंद दोरगे व इतर शेतकऱ्यांनी सदर रस्ता त्यांच्या वाडी-वस्तीकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता वाहतुकीसाठी असून, पर्यायी रस्ता नसल्याने तसेच संबंधित रस्ता जिल्हा परिषद पुणे यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले होते.  तसेच, गट क्र. २९३ व २९४ यातून सदर रस्ता जात असल्याने रस्ता खुला करावा, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. मात्र, अशोक मलभारे व इतरांनी न्यायालयात सदर रस्ता दुसरीकडे असल्याचे न्यायालयात पुरावे मांडले.  अखेर संबंधित रस्ता करण्याचे आदेश बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायलायाने दिला. पोलीस बंदोबस्तात ३ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. रस्त्याचे काम शेतातील नुकसान करून बेकायदेशीरपणे शासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला बळी पडून रस्ता केला होता. संबंधित विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांचा आरोप तीन वर्षांपासून सुरू होता यवत-पोंढे-कासाबाईवस्ती रस्त्याच्या संदार्भात वाद बारामती दिवाणी न्यायालयाने तत्कालीन तहसीलदार, दौंड यांचा आदेश रद्द करण्याचा निकाल दिला. संबंधित रस्ता वादींच्या क्षेत्रातून तयार करू नये, अशी निरंतर ताकीददेखील न्यायालयाने दिली आहे.