शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएसओ’ देणाऱ्या कंपनीचे काम संशयास्पद

By admin | Updated: March 12, 2016 01:14 IST

पंचायत समितीने ‘ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे काम संशयास्पद असून

शिरूर : पंचायत समितीने ‘ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे काम संशयास्पद असून, खिरापतीप्रमाणे प्रमाणपत्रवाटपाच्या या प्रकरणाची चौकशी व्हावीस अशी मागणी विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.निकषात बसत नसताना तसेच शाळांची तपासणी न करता ‘क्वालिटी असेसर्स’ या कंपनीने आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पंचायत समितीने प्रमाणपत्रवाटप बंद केले होते. अशा बोगस पद्धतीने प्रमाणपत्रवाटप केल्यामुळे ‘क्वालिटी अ‍ॅसेसर्स’वर कारवाईची मागणी करण्यात आली होती. पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केले व ७ ते ८ महिने प्रमाणपत्रवाटप बंद ठेवले. त्यानंतर पुन्हा त्याच कंपनीला उर्वरित शाळा, ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रवाटपाचे काम सुरू करण्याची मुभा दिली. याबाबत आज ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.जनता दलाचे युवक प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे म्हणाले, ‘‘आयएसओ मानांकन मिळणे म्हणजे त्या संस्थेचे शाळेचे काम त्या योग्यतेचे हवे. या मानांकनासाठी विविध प्रकारचे निकष आहेत. या निकषांत बसत असेल, तरच त्या संस्था-शाळांना प्रमाणपत्र दिले जाते; अन्यथा त्या मानांकनाचे महत्त्वच राहत नाही. ढोक सांगवीचा प्रकार ‘लोकमत’मधील वृत्तामुळेच समजला. कंपनी अशा प्रकारे प्रमाणपत्रवाटप करीत असल्यास त्याची चौकशी होणे अपेक्षितच आहे.’’ जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)